ICC ODI World Cup PAK vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान संघाचे पॅक अप झाले. इंग्लंडविरुद्धची आजची लढत आता केवळ औपचारिकता ठरली आहे. न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेला पराभूत करून चौथे स्थान पक्के केले. त्यानंतर पाकिस्तान जर तरच्या गणितात अडकली आणि त्यांच्यासमोर अशक्यप्राय समीकरण उभं राहिलं. त्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आता पाकिस्तानला ६.१ षटकांत ३०० धावांचे लक्ष्य पार करावे लागणार आहे.
इंग्लंडचा संघ - जॉनी बेअरस्टो, डेवीड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅऱी ब्रुक, जॉस बटलर, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गुस एटकिसन, आदिल राशीद
पाकिस्तानचा संघ - अब्दुल्लाह शफिक, फखऱ जमान, बाबर आजम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वासीम ज्यु., हॅरिस रौफ
पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश पक्का करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करून किमान २८८ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. उदा. जर ३०० धावा केल्यास इंग्लंडला १३ धावांवर गुंडाळावे लागेल, ३५० धावा केल्यास इंग्लंडला ६३ धावांवर गुंडाळावे लागेल आणि ४०० धावा केल्यास इंग्लंडला ११२ धावांवर गुंडाळावे लागेल. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केल्यास ते जे काही लक्ष्य ठेवतील ते ३ षटकांत पार करावे लागेल. या परिस्थितीत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचणे अवघडच आहे.

बाबर आजम म्हणाला, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, परंतु नाणेफेक आमच्या हातात नाही. आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि आम्ही इंग्लंडला लवकरात लवकर ऑल आऊट करायचा प्रयत्न करू.
पाकिस्तानचा अखेरची होप
- इंग्लंडने जर ५० धावा केल्या, तर त्या २ षटकांत पाकिस्तानला कराव्या लागतील
- इंग्लंडने जर १०० धावा केल्या, तर त्या २.५ षटकांत पाकिस्तानला कराव्या लागतील
- इंग्लंडने जर २०० धावा केल्या, तर त्या ४.३ षटकांत पाकिस्तानला कराव्या लागतील
- इंग्लंडने जर ३०० धावा केल्या, तर त्या ६.१ षटकांत पाकिस्तानला कराव्या लागतील
