Join us

हद्दच झाली! मोहम्मद रिझवानने DRS घेऊ की नको, हे बांगलादेशच्या फलंदाजालाच विचारले, Video 

ICC ODI World Cup PAK vs BAN Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानने दमदार कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 19:13 IST

Open in App

ICC ODI World Cup PAK vs BAN Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानने दमदार कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध इडन गार्डनवरील सामन्यात गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर फलंदाजांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळतेय. या सामन्यात यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) याची कृती चर्चेत आली. 

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी करून दाखवली. स्पर्धेबाहेर फेकले जाण्याची भीती मनात असूनही पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये आज दोस्ती यारी पाहायला मिळाली. बाबर आजम, मोहम्मद रिझवान व शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातल्या वादांच्या बातम्यांची आज हवा निघाली. शाहीन, मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर हॅरीस रौफने २ विकेट्स घेतल्या. बांगलादेशसाठीही हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे आणि त्यांच्याकडून लिटन दास ( ४५), महमुदुल्लाह ( ५६) व शाकिब अल हसन ( ४३) यांनी चांगला खेळ केला. मेहिदी हसन मिराझनेही २५ धावांचे योगदान दिले.  बांगलादेशचा संपूर्ण संघ ४५.१ षटकांत २०४ धावांवर तंबूत परतला.

शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर तस्कीन अहमदसाठी जोरदार अपील झाले. तस्कीनच्या बॅटला लागल्याचा अंदाज पाकिस्तानी खेळाडूंनी बांधला होता. DRS घ्यायचा की नाही, याबाबत पाकिस्तानी खेळाडू चर्चा करत होते. त्यावेळी रिझवानने थेट तस्कीनलाच विचारले आणि हा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानबांगलादेश