७.२ अंश कोनात फिरला चेंडू, कुलदीप यादवने टाकला बॉल ऑफ टुर्नामेंट; इंग्लिश कॅप्टन बोल्ड, Video 

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेता इंग्लंड सपशेल अपयशी ठरलेला दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 08:29 PM2023-10-29T20:29:34+5:302023-10-29T20:30:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs ENG Live : A delivery with a 7.2° turn, What a delivery by Kuldeep Yadav, he clean up Captain Jos Buttler, Video | ७.२ अंश कोनात फिरला चेंडू, कुलदीप यादवने टाकला बॉल ऑफ टुर्नामेंट; इंग्लिश कॅप्टन बोल्ड, Video 

७.२ अंश कोनात फिरला चेंडू, कुलदीप यादवने टाकला बॉल ऑफ टुर्नामेंट; इंग्लिश कॅप्टन बोल्ड, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेता इंग्लंड सपशेल अपयशी ठरलेला दिसतोय. आज भारताला २२९ धावांवर रोखल्यानंतर ते विजयाची चव चाखतील असे वाटत होते. पण, भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या दोघांनी सलग दोन चेंडूं दोन विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले होते. त्यात कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) ७.२ अंशाने चेंडू फिरवला अन् कर्णधार जोस बटलरचा त्रिफळा उडवला. या वर्ल्ड कप स्पर्धेतील हा बॉल ऑफ दी टुर्नामेंट ठरला तर आश्चर्य वाटायला नको.

हम पाँच! रोहित शर्माची टीम इंडियाच्या स्पेशल ५ मध्ये एन्ट्री; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम


 जॉनी बेअरस्टो व डेवीड मलान यांनी ३० धावांची सलामी दिली होती, परंतु जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूंत  मलान ( १६) आणि जो रूट ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्स ( ०) आणि बेअरस्टो ( १४) यांचा त्रिफळा उडवला. जलद माऱ्यानंतर रोहितने फिरकीपटूंना आणले आणि कुलदीप यावदने अप्रतिम चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरचा ( १०) त्रिफळा उडवला. इंग्लंडचा निम्मा संघ १५.१ षटकांत ५२ धावांवर तंबूत परतला.  


 

 
 

Web Title: ICC ODI World Cup IND vs ENG Live : A delivery with a 7.2° turn, What a delivery by Kuldeep Yadav, he clean up Captain Jos Buttler, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.