ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय संघाचा डाव सावरला आहे. रोहित शर्मा, इशान किशन व श्रेयस अय्यर हे खाते न उघडताच तंबूत परतले. पण, विराट कोहली ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल यांनी ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले. विराटने आज दोन विश्वविक्रम नोंदवले.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताच्या तीन फलंदाजांना शून्यावर माघारी पाठवले. मिचेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान ( ०) स्लीपमध्ये झेल देऊन परतला. त्यानंतर हेझलवूडने रोहितला ( ०) पायचीत केले. श्रेयसने (०) सावध खेळ करणे अपेक्षित होते, परंतु त्याने कव्हरच्या दिशेने फटका मारला अन् डेव्हिड वॉर्नरने तो टिपला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सुनील गावस्कर व क्रिष्णमचारी श्रीकांत शून्यावर बाद झाले होते. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही वन डेतील पहिलीच वेळ आहे.