Join us

IND vs AUS Live : गोंधळ! टीम इंडियाची जर्सी घालून 'तो' मैदानावर घुसला; विराट, लोकेशला भेटला अन्... 

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 15:21 IST

Open in App

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना सुरू आहे. तिसऱ्या षटकात बसलेल्या धक्क्यानंतर डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे.  पण हा सामना सुरू असताना टीम इंडियाची जर्सी घालून एक चाहता दोनवेळा मैदानावर शिरला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ​​'जार्व्हो ६९' या नावाने ओळखला जाणारा हा चाहता मैदानावर पहिल्यांदा आला तेव्हा त्याने विराट कोहलीची भेट घेतली, त्यानंतर दुसऱ्यांदा तो लोकेश राहुलकडे गेला. भारताच्या यष्टिरक्षकाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.  

IND vs AUS Live : डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम; रोहित शर्मा बनला भारताचा 'वयस्कर' कॅप्टन

जार्व्होने असा स्टंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये भारताच्या कसोटी मालिकेदरम्यान, त्याने सलग दोन सामन्यांमध्ये मैदानात प्रवेश केला, ज्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. हा एक ब्रिटीश यूट्यूबर आणि प्रँकस्टर आहे. भारतीय क्रिकेटपटूंची नक्कल करण्याच्या त्याच्या कृतीमुळे तो कुप्रसिद्ध झाला आहे. २०२१ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर तो आला होता.

भारतीय जर्सी घालून त्याने भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य असल्याचे भासवले होते. त्याचा धाडसीपणा तिथेच संपला नाही. हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवरील त्यानंतरच्या तिसऱ्या कसोटीत, सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर, संपूर्ण क्रिकेट पोशाखात सुसज्ज असलेल्या जार्व्होने स्वतः फलंदाजीला उतरला होता.  

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन षटकं सावध खेळ करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने धक्का दिला. मिचेल मार्शचा ( ०) भन्नाट झेल विराट कोहलीने पहिल्या स्लीपमध्ये घेतला. डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळ करताना डाव सावरला. वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. त्याने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. सुरेख फटके मारणाऱ्या वॉर्नरला बाद करण्यासाठी रोहितने ८व्या षटकात आर अश्विनला आणले. अश्विनने टाकलेल्या चेंडूला मिळालेली उसळी पाहून स्मिथ चकित झाला. वॉर्नरने मारलेला फटका अडवताना हार्दिक पांड्याच्या बोटाला दुखापत झाली आणि तो काहीकाळ मैदानाबाहेर गेला होता.. ( IND vs AUS Live Scoreboard ) 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑफ द फिल्ड