Join us

क्रिकेटच्या देवाचा आशीर्वाद! विराट कोहलीला सामन्याआधी सचिन तेंडुलकरची खास भेट

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : १९८३, २०११ नंतर भारतीय संघाला १२ वर्षांनी पुन्हा वन डे वर्ल्ड कप उंचावण्याची संधी आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 14:06 IST

Open in App

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : १९८३, २०११ नंतर भारतीय संघाला १२ वर्षांनी पुन्हा वन डे वर्ल्ड कप उंचावण्याची संधी आहे. मागील दोन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये यजमान संघाने वर्ल्ड कप उंचावला आहे आणि याहीवेळेस हाच पराक्रम पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. पण, त्यांच्यासमोर पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. २०११चा वर्ल्ड कप हा सचिनमय होता आणि हा वर्ल्ड कप विराटमय आहे. या सामन्यापूर्वी सचिनने किंग कोहलीला त्याची २०११च्या वर्ल्ड कपची साईन जर्सी भेट दिली. 

खेळपट्टी ड्राय असल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऐकताच प्रेक्षकांनी जल्लोष साजरा केला, कारण टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करावी अशी त्यांची इच्छा होती. दोन्ही संघांनी तिच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवली आहे. २०११च्या वर्ल्ड कप उपांत्यपूर्व फेरीत भारताने याच मैदानावर ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले होते. आज त्याच विजयाची पुनरावृत्ती करून २००३ फायनलच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली. या सामन्यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने विराटला त्याची २०११च्या वर्ल्ड कपची साईन केलेली जर्सी आणि एक फोटो ( ज्यात विराटने सचिनला मिठी मारलीय) भेट म्हणून दिला. 

भारत - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराजऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया