ICC ODI World Cup ENG vs SL Live : इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. ४पैकी ३ सामन्यांत दोघांनाही हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील निकाल दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. पण, १९९९नंतर वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमध्ये श्रीलंकेने वर्चस्व गाजवले आहे आणि आजही तेच चित्र पाहायला मिळाले.
पहिल्या चेंडूवर ड्रामा! इंग्लंडच्या खेळाडूने सहकाऱ्याला फसवलं, पाहा Video नेमकं काय घडलं
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि जॉनी बेअरस्टो व डेविड मलान यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टो बाद झाला असता, परंतु श्रीलंकेने DRS न घेतल्याने तो वाचला. मात्र, रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेल्या अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने पहिल्याच षटकात मलानला ( २८) बाद केले. १९९९ मध्ये इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेत शेवटचं श्रीलंकेला पराभूत केलं होतं. त्यानंतर श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध हार मानलेली नाही. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या विजयातील नायक अँजेलो मॅथ्यूजने आज पुनरागमन करताना पहिली विकेट मिळवून दिली.
मैदानावर सेट झालेला आणि इंग्लंडसाठी किल्ला लढवणाऱ्या बेन स्टोक्सचा संयम अखेर ३१व्या षटकात तुटला. लाहिरु कुमाराच्या बाऊन्सवर त्याने टोलावलेला चेंडू हेमंथाने सीमारेषेवर टिपला. स्टोक्स ७३ चेंडूंत ४३ धावांत तंबूत परतला. आदील राशीद विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. थिक्षणाने शेवटची विकेट घेऊन इंग्लंडचा संपूर्ण संघ ३३.२ षटकांत १५६ धावांत तंबूत पाठवला. कुमाराने ३, रजिथा व मॅथ्यूज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.