Join us  

चोकर्स! दक्षिण आफ्रिकेची महत्त्वाच्या सामन्यात हाराकिरी, ऑस्ट्रेलियाने कोंडी केली, Video 

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत कच खाल्ली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 2:39 PM

Open in App

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत कच खाल्ली... त्यांनी पुन्हा एकदा चोकर्स असल्याचे दाखवून दिले. स्पर्धेत ५९४ धावा चोपणारा क्विंटन डी कॉक ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या दडपणाला बळी पडला. अनफिट असूनही आणि फॉर्मात नसतानाही टेम्बा बवुमाचा खेळण्याचा हट्ट महागात पडला. ऑस्ट्रेलियाने त्यांचे दोन्ही सलामीवीर ८ धावांवर गमावले. 

भारताविरुद्ध वर्ल्ड कप फायनल कोण खेळणार, याचा फैसला आज होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरू आहे. टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये लुंगी एनगिडीच्या जागी तब्रेझ शम्सीला संधी दिली. ऑस्ट्रेलियानेही मार्कस स्टॉयनिस व सीन एबॉट यांच्या जागी ग्लेन मॅक्सवेल व मिचेल स्टार्क यांना खेळवले आहे.  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ ७ वेळा समोरासमोर आले आहेत आणि दोघांनीही प्रत्येकी ३ विजय मिळवले आहेत. १९९९ मध्ये उपांत्य फेरीचा सामना टाय झाला होता. तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत भिडत आहेत. 

पूर्णपणे तंदुरूस्त नसूनही बवुमा मैदानावर उतरल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आजही बवुमा भोपळ्यावर बाद झाला, मिचेल स्टार्कने ही विकेट घेतली. स्टार्कच्या धक्क्यानंतर जोश हेझलवूडने अचूक मारा करून आफ्रिकेच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केले होते. सहाव्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉक ( ३) झेलबाद झाला. आफ्रिकेला ८ धावांवर २ धक्के बसले. या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या ५ षटकांत सर्वात कमी ८ धावांची नकोशी कामगिरी आज आफ्रिकेने नोंदवली. कोलकातामध्येच पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशची अवस्था २ बाद १० धावा अशी झाली होती.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाक्विन्टन डि कॉक