नेदरलँड्स रन 'OUT'! अफगाणिस्तानच्या फिरकीची जादू, पाकिस्तानचं वाढलं टेंशन 

ICC ODI World Cup AFG vs NED Live : अफगाणिस्तानने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखण्याचा निर्धार केलेला दिसतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:17 PM2023-11-03T17:17:11+5:302023-11-03T17:17:22+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup AFG vs NED Live : Afghanistan needs 180 runs to defeat the Netherlands, top 4 players get run out  | नेदरलँड्स रन 'OUT'! अफगाणिस्तानच्या फिरकीची जादू, पाकिस्तानचं वाढलं टेंशन 

नेदरलँड्स रन 'OUT'! अफगाणिस्तानच्या फिरकीची जादू, पाकिस्तानचं वाढलं टेंशन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup AFG vs NED Live : अफगाणिस्ताननेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखण्याचा निर्धार केलेला दिसतोय... नेदरलँड्सला चांगल्या सुरुवातीनंतर अफगाणिस्तानने बॅकफूटवर फेकले. एकवेळ ७३ धावांवर त्यांचा एकच फलंदाज माघारी परतला होता, परंतु पुढील २४ धावांत ४ विकेट्स पडल्या. त्यापैकी ३ फलंदाज हे रन आऊट झाले आणि अफगाणिस्तानने कमबॅक केले. नेदरलँड्सकडून अर्धशतक झळकावणारा सायब्रँड एंगेलब्रेचही रन आऊट झाला. 


मुजीब उर रहमानने पहिल्याच षटकात वेस्ली बॅरेसी ( १) याला माघारी पाठवले. मॅक्स ओडोव आणि कॉलिन एकरमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करून दाव सावरला होता. पण, ही दोन्ही सेट फलंदाज रन आऊट झाली. कर्णधार स्कॉट एडवर्डही ( ०) रन आऊट होऊन माघारी परतला आणि त्यात बॅस डे लीड ( ३) मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर बाद झाला. या वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने पहिल्या २० षटकांत सर्वाधिक ३० विकेट्स गमावल्या आहेत. त्यांनी इंग्लंड ( २६) व बांगलादेश ( २६) यांना माघारी पाठवले. २६व्या षटकात साकिब जुल्फिकार ( ३) ला नूर अहमदने बाद केले.


सायब्रँड एंगेलब्रेचने ८६ चेंडूंत ५८ धावांची खेळी करून नेदरलँड्सला सावरले होते, परंतु तोही रन आऊट झाला आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासात आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी ४ रन आऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. नेदरलँड्सचा संपूर्ण संघ ४६.३ षटकांत १७९ धावांवर तंबूत परतला. मोहम्मद नबीने ३ व नूर अहमदने दोन विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तान आज जिंकल्यास पाकिस्तानचं टेंशन वाढू शकते. 

Web Title: ICC ODI World Cup AFG vs NED Live : Afghanistan needs 180 runs to defeat the Netherlands, top 4 players get run out 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.