Join us  

SA vs AUS Live : चतूर आफ्रिकेमुळे ऑस्ट्रेलिया संकटात! स्टीव्ह स्मिथला विकेटवर बसला नाही विश्वास, Video 

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे काही खरं दिसत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 7:25 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे काही खरं दिसत नाही... भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्यांची वाताहत झालेली पाहायला मिळतेय. ३१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज ५६ धावांवर माघारी परतले आहेत. स्टीव्ह स्मिथ ( steve Smith) ला त्याच्याच विकेटवर विश्वास बसेनासा झालेला पाहायला मिळाला. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आज पुन्हा एकदा तीनशेपार मजल मारली. २०२३ मध्ये त्यांनी सलग पाचव्यांदा ३००+ धावा उभ्या केल्या. आज क्विंटन डी कॉक ने सलग दुसरे शतक झळकावले आणि एडन मार्करमने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. क्विंटन आणि बवुमा यांनी १०८ धावांची सलामी दिली. बवुमा ( ३५), व्हॅन डेर ड्यूसेन ( २६), हेनरिच क्लासेन ( २९) यांच्या योगदानानंतर एडन मार्करम ( ५६) याने अर्धशतक खेळी केली. क्विंटन १०६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०९ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. अॅडम झम्पाने १० षटकांत सर्वाधिक ७० धावा देताना १ विकेट घेतली. मार्को यानसनने ( २६) अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून आफ्रिकेला  ७ बाद ३११ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण अगदीच गचाळ झाले.

लुंगी एनगिडी आणि मार्को यानसेन यांच्या वेगवान माऱ्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना जखडून ठेवले होते. त्यातही डेव्हिड वॉर्नरने तांत्रिक फटके मारून सुरेख चौकार मिळवले.  

मिचेल मार्श ( ७) पुन्हा अपयशी ठरला अन् यानसेनच्या चेंडूवर त्याने बवुमाकडे सोपा झेल दिला. पुढच्याच षटकात एनगिडीने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का देताना वॉर्नरला (१३) बाद केले. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर २७ धावांत माघारी परतले. कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्या षटकात स्टीव्ह स्मिथला ( १९) पायचीत केल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था १० षटकांत ३ फलंदाज ५० धावांत माघारी परतले. रबाडाने पुढच्या षटकात जॉश इंग्लिसचा अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथद. आफ्रिका