T20I World Cup 2021 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट

ICC men's T20I World Cup Rule change : आयसीसीनं रविवारी या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेसह काही नव्या नियमांचीही घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 03:43 PM2021-10-10T15:43:33+5:302021-10-10T15:59:13+5:30

whatsapp join usJoin us
ICC men's T20I World Cup : For the first time in an ICC men's T20I tournament the DRS will be in use as the ICC has announced  | T20I World Cup 2021 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट

T20I World Cup 2021 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC men's T20I World Cup Rule change : मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे स्थगित केली गेली. याही वर्षी या स्पर्धेवर कोरोनाचे संकट होते, पण यजमान भारतानं ही स्पर्धा यूएईत खेळवण्याची तयारी दर्शवली. आता १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पात्रता  फेरीचे सामने आणि त्यानंतर सुपर १२मध्ये लढती व १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. आयसीसीनं रविवारी या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेसह काही नव्या नियमांचीही घोषणा केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील सामना पाहण्यापूर्वी या नव्या नियमांची माहिती क्रिकेट चाहते म्हणून करून घेणे गरजेचे आहे. 

DRS to be used in men's T20 World Cup for the first time - आयसीसीनं प्रथमच पुरुषांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत DRS ( Decision Review System) चा वापर करण्याचा निर्णय जाहीर केला. आयसीसीनं स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या प्लेइंग कंडिशनमध्ये याचा उल्लेख केला गेला आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा ओमान व यूएई येथे संयुक्तरित्या पार पडणार आहे आणि त्यात आता प्रत्येत संघाला प्रती डाव किमान दोन रिव्ह्यू घेता येतील. 

याशिवाय एकादा सामना पाहसामुळे थांबला, तर त्यातील किमान षटकांची मर्यादाही वाढवली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अशी परिस्थिती उद्भवल्यास निकालासाठी प्रत्येकी संघ किमान पाच षटकं खेळणे गरजेचे आहे. हा नियम सध्याच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त लागू आहे. पण, उपांत्य फेरी व अंतिम फेरीत यात बदल करण्यात आले असून निकालासाठी प्रत्येक संघाला किमान १० षटकं खेळावी लागतील. गतवर्षी झालेल्या महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हा नियम लागू करण्यात आला होता. त्या स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. राखीव दिवस नसल्यानं इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले होते.

ICC  men's T20 World Cup च्या मागील पर्वात DRS चा वापर केला गेला नव्हता, कारत २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० स्पर्धेत या नियम लागू केला गेला नव्हता. २०१८साली महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथम DRS चा वापर केला गेला होता आणि २०२०च्या महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही तो नियम होता. सामन्यात कमीतकमी चुका व्हाव्यात यासाठी DRSचा वापर केला जाणार आहे.  

संबंधित बातमी

T20 World Cup prize money : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार कोट्यवधींचं ईनाम 

Web Title: ICC men's T20I World Cup : For the first time in an ICC men's T20I tournament the DRS will be in use as the ICC has announced 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.