Join us  

Uganda ने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी ठरले पात्र; झिम्बाब्वे पुन्हा अनलकी 

ICC Men's T20 World Cup Africa Qualifier स्पर्धेत युगांडाने आज ऐतिहासिक कामगिरी केली. रवांडाविरुद्धच्या सामन्यात युगांडाने विजय मिळवला आणि २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट पक्के केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 3:16 PM

Open in App

ICC Men's T20 World Cup Africa Qualifier स्पर्धेत युगांडाने आज ऐतिहासिक कामगिरी केली. रवांडाविरुद्धच्या सामन्यात युगांडाने विजय मिळवला आणि २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट पक्के केले. युगांडाच्या विक्रमी कामगिरीमुळे मात्र झिम्बाब्वेला पुन्हा एकदा वर्ल्ड कप स्पर्धेपासून वंचित रहावे लागले. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढल्या वर्षी  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यात प्रवेश करणारा युगांडा हा शेवटचा व वीसावा संघ ठरला आहे.

आफ्रिका विभागातील पात्रता फेरीतून नामिबियाने सलग पाच सामने जिंकून वर्ल्ड कपचे तिकीट पटकावले. एका जागेसाठी झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा हे तीन देश शर्यतीत होते, परंतु युगांडाने बाजी मारली. आफ्रिका विभागातून दोन संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते आणि त्यापैकी १ जागा शिल्लक आहे. युगांडा संघाने या स्पर्धेत आधीच झिम्बाब्वेवर विजय मिळवला होता आणि तो निकाल महत्त्वाचा ठरला.  युगांडा गुणतालिकेत ६ सामन्यांत ५ विजय व १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि वर्ल्ड कपचे तिकीट पक्के केले.

आजच्या सामन्यात काय झाले?युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या अल्पेश रामजानी ( २-१), दिनेश नाक्रानी ( २-१६), हेनरी सेन्योंदो ( २-१०) व ब्रायन मसाबा ( २-१०) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून रवांडाचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत ६५ धावांत तंबूत पाठवला. रवांडाकडून एरिक डुसिंगिजिमानाने १९ व मुहम्मद नादीरने ११ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोनक पटेलने १८ धावा करून सलामीवीर सिमॉन सेसाझीसह ३१ धावांची सलामी दिली. त्यानंतर सेसाझी ( २६) व रॉजर मुसाका ( १३) यांनी युगांडाला विजय मिळवून दिला. युगांडाने ८.१ षटकांत १ बाद ६६ धावा करून विजय मिळवला. ( Uganda Cricket team has qualified for the T20 World Cup for the first time.) 

युगांडाचा क्रिकेट प्रवास१९५८ मध्ये युगांडाचे खेळाडू केन्या व तंझानिया यांच्या खेळाडूंसह ईस्ट आफ्रिका टीम बनून आयसीसी स्पर्धांमध्ये खेळले होते. १९७५च्या वर्ल्ड कपमध्ये ईस्ट आफ्रिकेचा संघ खेळला होता आणि त्यांना तीनही सामन्यांत हार पत्करावी लागली होती. १९८९मध्ये ईस्ट आफ्रिका टीम वेगळी झाली आणि ईस्ट-सेंट्रल आफ्रिका संघ अशी विभागणी झाली. यात मलावी, तंझानिया, युगांडा आणि झाम्बिया हे चार देश होते. १९९८मध्ये युगांडाला आयसीसीच्या असोसिएट सदस्याचा मान मिळाला. २००१ मध्ये आयसीसी ट्रॉफीत ते पहिला आंतरराष्ट्रीय सामना.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२झिम्बाब्वेआयसीसी