जागतिक क्रिकेटमध्ये आज ऐतिहासिक चमत्कार घडणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी नवा संघ मिळणार

ICC Men's T20 World Cup Africa Qualifier - अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढल्या वर्षी खेळवण्यात येणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील वीसावा ( २०) संघ आज ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:24 AM2023-11-30T11:24:00+5:302023-11-30T11:24:24+5:30

whatsapp join usJoin us
ICC Men's T20 World Cup Africa Qualifier - Uganda are a win over Rwanda away from qualifying for the T20 World Cup 2024 | जागतिक क्रिकेटमध्ये आज ऐतिहासिक चमत्कार घडणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी नवा संघ मिळणार

जागतिक क्रिकेटमध्ये आज ऐतिहासिक चमत्कार घडणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी नवा संघ मिळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men's T20 World Cup Africa Qualifier - अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढल्या वर्षी खेळवण्यात येणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील वीसावा ( २०) संघ आज ठरणार आहे. आफ्रिका विभागातील पात्रता फेरीतून नामिबियाने सलग पाच सामने जिंकून वर्ल्ड कपचे तिकीट पटकावले. आता एका जागेसाठी झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा हे तीन देश शर्यतीत आहेत. पण, आज क्रिकेटच्या इतिहासात मोठा चमत्कार होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे.


नामिनिबायने ५ पैकी ५ सामने जिंकून आपले स्थान पक्के केले आहे. आफ्रिका विभागातून दोन संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत आणि त्यापैकी १ जागा शिल्लक आहे. आज युगांडा विरुद्ध रवांडा, झिम्बाब्वे विरुद्ध केन्या आणि नायजेरिया विरुद्ध नामिबिया अशा तीन लढती होणार आहेत. यापैकी युगांडा व झिम्बाब्वे यांच्याततल्या लढती महत्वाच्या आहेत. युगांडा संघाने साखळी फेरीत झिम्बाब्वेवर विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती आणि आज तेच झिम्बाब्वेच्या मार्गात अडथळा बनून उभे राहिले आहेत.


युगांडा गुणतालिकेत ५ सामन्यांत ४ विजय व ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर झिम्बाब्वेला ५ सामन्यांत ३ विजय मिळवून ६ गुणच कमावता आले आहेत. केन्याचीही तिच परिस्थिती आहे. युगांडाने आज रवांडाला पराभूत केल्यास ते अमेरिका व वेस्ट इंडिजचे तिकीट जिंकतील आणि ही त्यांच्यासाठी खूप मोठी झेप असेल. युगांडाने मागील १६ सामन्यांत रवांडावर एकहाती विजय मिळवला आहे आणि हे आकडे पाहता झिम्बाब्वेला आणखी एका वर्ल्ड कपला थोडक्यात मुकावे लागणार आहे.  


युगांडाचा क्रिकेट प्रवास
१९५८ मध्ये युगांडाचे खेळाडू केन्या व तंझानिया यांच्या खेळाडूंसह ईस्ट आफ्रिका टीम बनून आयसीसी स्पर्धांमध्ये खेळले होते. १९७५च्या वर्ल्ड कपमध्ये ईस्ट आफ्रिकेचा संघ खेळला होता आणि त्यांना तीनही सामन्यांत हार पत्करावी लागली होती. १९८९मध्ये ईस्ट आफ्रिका टीम वेगळी झाली आणि ईस्ट-सेंट्रल आफ्रिका संघ अशी विभागणी झाली. यात मलावी, तंझानिया, युगांडा आणि झाम्बिया हे चार देश होते. १९९८मध्ये युगांडाला आयसीसीच्या असोसिएट सदस्याचा मान मिळाला. २००१ मध्ये आयसीसी ट्रॉफीत ते पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळले आणि २३ वर्षानंतर ते ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

पात्र ठरलेले १९ संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया 

स्पर्धेचा फॉरमॅट...
२० संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी केली जाईल. चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. त्यानंतर ४-४ अशा दोन गटांत त्यांची विभागणी होईल आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. त्यानंतर उपांत्य फेरी व फायनल असा सामना होईल.  

 

हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेणं मुंबई इंडियन्सला फायद्याचं ठरेल का?

हो (1712 votes)
नाही (1403 votes)

Total Votes: 3115

VOTEBack to voteView Results

Web Title: ICC Men's T20 World Cup Africa Qualifier - Uganda are a win over Rwanda away from qualifying for the T20 World Cup 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.