Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup Schedule : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारत-पाकिस्तान कधी भिडणार

ICC Men's T20 World Cup 2021 Fixtures revealed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 10:53 IST

Open in App

ICC Men's T20 World Cup 2021 Fixtures revealed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची गटवारी आयसीसीनं आधीच जाहीर केली होती, फक्त कोणता संधी कधी, कुठे व कोणाशी भिडेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या तारखेची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेरीस आयसीसीन या सर्वांवरील पडदा हटवला अन् आज संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.  

 

सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ पाच सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.

पात्रता फेरीत सहभागी संघगट १ - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबियागट २ - बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान

पात्रता फेरीचं वेळापत्रक१७ ऑक्टोबर - ओमान वि. पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड१८ ऑक्टोबर - आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. नामिबिया१९ ऑक्टोबर - स्कॉटलंड वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. बांगलादेश२० ऑक्टोबर - नामिबिया वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. आयर्लंड२१ ऑक्टोबर - बांगलादेश वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि.  स्कॉटलंड२२ ऑक्टोबर - नामिबिया वि. आयर्लंड आणि श्रीलंका वि. नेदरलँड्स 

सुपर १२ फेरीतील संघगट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

सुपर १२ चे वेळापत्रक

ग्रुप १ २३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता            - इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, दुबई , वेळ सांयकाळी ७.०० वाजता२४ ऑक्टोबर - अ गटातील अव्वल वि. ब गटातील उपविजेता. शाहजाह, वेळ दुपारी ३.३० वाजता            दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता२७ ऑक्टोबर - इंग्लंड वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता२८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता२९ ऑक्टोबर - वेस्ट इंडिज वि. ब गटातील उपविजेता, शारजाह, वेळ  दुपारी ३.३० वाजता३० ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, वेळ - दुपारी ३.३० वाजता           इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता१ नोव्हेंबर - इंग्लंड वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता२ नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता४ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता      वेस्ट इंडिज वि. अ गटातील अव्वल, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता६ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता 

ग्रुप २२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता२५ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता२६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता२७ ऑक्टोबर - ब गटातील अव्वल वि. अ गटातील उपविजेता, अबुधाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता२९ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३१ ऑक्टोबर- अफगाणिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबुधाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता                       भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता२ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता३ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. ब गटातील अव्वल, दुबई, दुपारी ३.३० वाजता                   भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता७ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, दुपार ३.३० वाजता      पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता

उपांत्य फेरीचे सामने  -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अंतिम सामना - १४ नोव्हेंबर 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App