ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतनं दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:58 IST2025-06-25T16:50:30+5:302025-06-25T16:58:51+5:30

whatsapp join usJoin us
ICC Latest Test Rankings Rishabh Pant Acheive Carrer Best Rankings Jasprit Bumrah Jasprit Bumrah Joe Root Remains On Top | ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम

ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Latest Test Rankings Rishabh Pant  : भारत-इंग्लंड यांच्यातील लीड्स येथील हेडिंग्ले कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) जाहीर केेल्या नव्या कसोटी क्रमवारीत रिषभ पंतला मोठा फायदा झाला आहे. हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात पंतनं दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटर अँडी फ्लॉवर याच्यानंतर एका कसोटी सामन्यात दोन शतके झळकवणारा तो दुसरा विकेट किपर बॅटर ठरला. या विक्रमी कामगिरीसह रिषभ पंत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम रँकिंगवर पोहचला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रिषभ पंतसह बेन डकेटही फायद्यात

आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत रिषभ पंत एका स्थानाच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात आता ८०१ रेटिंग पॉइंट्स जमा झाले आहेत. ही पंतची आयसीसीच्या कसोटी क्रमावीरीतील आतापर्यंतची सर्वोत्तम रँकिंग आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या ताफ्यातील सलामीवीर बेन डकेट याने पहिल्या डावातील अर्धशतकानंतर दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. तोही पाच स्थानांनी झेप घेत करिअरमधील सर्वोत्तम आठव्या क्रमांकावर पोहचला आहे.

रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...

बुमराह-रूट की बादशाह कायम

 आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि फलंदाजीत जो रुटची बादशाहत कायम आहे. जसप्रीत बुमराहनं इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तो ९०७ रेटिंग पॉइंट्ससह गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानावर कायम आहे. बुमराहची करिअरमधील बेस्ट रँकिंगचा आकडा ९०८ असून इंग्लंड दौऱ्यावर तो नवा रेकॉर्ड प्रस्थापित करु शकतो.  कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम बेस्ट रँकिंग ९३२ असलेला जो रुट सध्याच्या घडीला ८८९ रेटिंग पॉइंट्ससह नंबर वनवर कायम आहे. त्याच्यापाठोपाठ इंग्लंडचा स्टार हॅरी ब्रूक ८७४ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंडच्या केन विल्यमसन (८६७) पाठोपाठ यशस्वी जैस्वाल ८५१ रेटिंग पॉइंट्सह चौथ्या स्थानावर आहे. 
 

 

Web Title: ICC Latest Test Rankings Rishabh Pant Acheive Carrer Best Rankings Jasprit Bumrah Jasprit Bumrah Joe Root Remains On Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.