CT 2025, South Africa vs New Zealand, 2nd Semi-Final : पाकिस्तान येथील लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करत दक्षिण आफ्रिकेसमोर टार्गेट सेट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळण्यासाठी दुबईची फ्लाइट पकडण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. शेवटी बाजी कोण मारणार अन् फायनलमध्ये भारताविरुद्ध कोण खेळणार ते चित्र या सामन्याच्या निकालावर ठरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडसाठी तिरंगी मालिकेतील कामगिरी ठरेल जमेची बाजू , दक्षिण आफ्रिकेला लावावा लागेल जोर
दक्षिण आफ्रिकेचा संघ 'ब' गटात एकही सामना न गमावता अव्वलस्थानी राहिला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघानं भारतीय संघाविरुद्धचा सामना सोडला तर स्पर्धेत दबदबा दाखवून दिलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका रंगली होती. यात न्यूझीलंडनं फायनल बाजी मारली होती. त्यामुळे या सामन्यात न्यूझीलंडचा संघाचे पारडे थोडे जड असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ तिरंगी मालिकेत जे झाले ते विसरून चॅम्पियन्स होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी जोर लावेल.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन- रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन (विकेट किपर), डेविड मिलर, एडन मार्कराम, मल्डर, मार्को यान्ससेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: विल यंग, रचिन रवींद्र, केन विलियम्सन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेट किपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, कायले जेमिसन, विल्यम ओरर्के
Web Title: ICC Champions Trophy 2025 SA vs NZ 2nd Semi Final New Zealand have won the toss and have opted to bat At Gaddafi Stadium Lahore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.