चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील कराची स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात 'ब' गटातील साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळवण्यात येत आहे. सातत्याने टॉस जिंकून मॅच गमावणारा कॅप्टन असा टॅग लागलेल्या जोस बटलरनं पुन्हा एकदा टॉस जिंकला. या सामन्यानंतर तो इंग्लंडचा कॅप्टन राहणार नाही. त्यामुळे ही मॅच तरी इंग्लंड जिंकणार का ते पाहण्याजोगे असेल.
बटलरनं टॉस जिंकला, मॅच जिंकून आफ्रिकेला ग्रुप टॉप करत सेमीत धडक मारण्याची संधी
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ नियमित कॅप्टन टेम्बा बवुमाच्या अनुपस्थिती मैदानात उतरला आहे. एडन मार्कम कार्यवाहून कॅप्टनच्या रुपात मैदानात उतरणार आहे. इंग्लंडचा स्पर्धेतील प्रवास आधीच संपुष्टात आला आहे. हा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी ते मैदानात उतरतील. दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून आपल्या गटात अव्वलस्थानावर झेप घेत सेमीत एन्ट्री मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन- फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन- ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्री क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी