सलामीवीर विल यंग आणि विकेट किपर बॅटर टॉम लॅथम या दोघांची शतकी खेळी आणि अखेरच्या षटकातील ग्लेन फिलिप्सनं केलेली फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या लढत ३०० पारची केली आहे. नाणफेक गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या संघातील आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतेल. पण त्यानंतर तिघांनी अगदी दमदार खेळीचा नजराणा पेश करत पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या लढतीत निर्धारित ५० षटकात ५ बाद ३२० धावा केल्या. यजमान पाकिस्तानला सलामीचा सामना जिंकण्यासाठी ३२१ धावा कराव्या लागणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यंग विल अन् लॅथमची शतकी भागीदारी
पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या संघानं ७३ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे सामन्यावर यजमान पाकिस्तानची पकड मजबूत होतीये, असं चित्र निर्माण झाले होते. पण विल यंग आणि टॉम लॅथम जोडी जमली अन् पाक गोलंदाजांचे खांदेच पडले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. यात विल यंगनं ११३ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०७ धावांची खेळी केली. तो नसीम शाहच्या गोलंदाजीवर बाद होऊन परतल्यावर टॉमनं ग्लेन फिलिप्सच्या साथीनं आणखी एक तगडी भागीदारी रचली.
लॅथम-ग्लेन फिलिप्स जोडी अखेरच्या षटकात फुटली
विल यंग शतकी खेळी करून परतल्यावर टॉम लॅथमसोबत ग्लेन फिलिप्सनं आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी रचली. टॉम लॅथम १०४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ११८ धावांवर नाबाद राहिला. दुसरीकडे ग्लेन फिलिप्सनं ३९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६१ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात ग्लेन फिलिप्स बाद झाला. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हॅरिस राउफ या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय अब्रारला एक विकेट मिळाली.