IND vs AUS Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सेमी फायनलसाठी भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ दुबईच्या मैदानात उतरले आहेत. या सामन्यात रोहित शर्मानं पुन्हा एकदा टॉस गमावला आहे. दुसरीकडे स्टीव्ह स्मिथनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला असून धावांचा पाठलाग करून फायनल गाठण्याच्या इराद्याने ते सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असली. रोहित शर्मा सातत्याने टॉस गमावलाय ही गोष्ट खरीये. पण टॉस गमावल्यावर भारतीय संघानं मॅच जिंकण्याचा सिलसिला ही दाखवून दिलाय. हीच गोष्ट पुन्हा दिसावी अन् भारतीय संघानं फायनल गाठावी, अशीच इच्छा टीम इंडियातील खेळाडूंसह तमाम भारतीय चाहत्यांना असेल.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन-: कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा.
भारतीय प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
Web Title: ICC Champions Trophy 2025 IND vs AUS 1st Semi Final Steve Smith Won And Rohit Sharma Agains Loss Toss and Australia have opted to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.