Join us

NZ vs BAN : शांतीत क्रांती! बांगलादेश कॅप्टन शांतोच्या भात्यातून आली विक्रमी 'फिफ्टी'

बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने एकाकी झुंज देत ठोकले दमदार अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:07 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 'अ' गटातील बांगलादेश आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. रावळपिंडीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी अचूक मारा करत आपल्या कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरला. एका बाजूला ठराविक अंतराने विकेट पडत असताना बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने एकाकी झुंज देत दमदार अर्धशतक झळकावले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शतक हुकले, तरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याची खेळी ठरली विक्रमी

तो या सामन्यात शतकी डाव साधेल, असे वाटत होते. पण ७७ धावांवर तो बाद झाला. शतकाची संधी हुकली असली तरी त्याने संघाचा डाव सावरण्याशिवाय एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. नजमुल हुसेन शांतो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकवणारा बांगलादेशचा पहिला कर्णधार ठरला आहे. शांतोने ७१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील त्याचे हे दहावे अर्धशतक आहे. रावळपिंडीच्या मैदानात रंगलेल्या  सामन्यात त्याच्या या खेळीमुळे बांगलादेशचा संघ सावरला. 

आयसीसीच्या वनडे स्पर्धेत अर्धशतकी खेळी करणारा दुसरा कॅप्टन

बांगलादेशकडून डावाची सुरुवात करताना कर्णधार शांतोने तांझिद हसनसोबत पहिल्या विकेटसाठी ५० चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर बांगलादेशच्या संघानं ठराविक अंतराने विकेट गमावल्या. संघ अडचणी असताना कॅप्टनने संयमी खेळी करत संघाला सावरणारा डाव खेळला. आयसीसीच्या वनडे स्पर्धेत अर्धशतकी खेळी करणारा  शाकिब अल हसन नंतर शांतो हा बांगलादेशचा दुसरा कर्णधार आहे.

आयसीसी वनडे स्पर्धेत बांगलादेशकडून अर्धशतक झळकवणारे कॅप्टन 

शाकिब अल हसन ५५ धावा विरुद्ध भारत,  मीरपूर (२०११)

शकिब अल हसन ८२ धावा विरुद्ध श्रीलंका, दिल्ली (२०२३)

नजमुल हुसेन शांतो ७७* विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी (२०२५) 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५बांगलादेशन्यूझीलंड