Join us  

 "मी बाबरला खरेदी करण्यासाठी माझे सर्व पैसे खर्च करेन", इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान 

Babar Azam, the hundred 2023 : पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमला द हंड्रेडमध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 2:01 PM

Open in App

James Anderson on babar azam । नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) कर्णधार बाबर आझमबद्दल (babar azam) इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स ंडरसनने एक मोठे विधान केले आहे. अलीकडेच झालेल्या द हंड्रेडच्या ड्राफ्टमध्ये बाबर आझमला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. त्यामुळे बाबर आझमला खरेदी करण्यासाठी मी माझे सर्व पैसे खर्च करेन असे जेम्स ंडरसनने म्हटले आहे. खरं तर द हंड्रेडच्या यंदाच्या हंगामाची सुरूवात 1 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी झालेल्या ड्राफ्टमध्ये एकूण 64 महिला आणि पुरूष खेळाडूंची निवड करण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे यासाठी प्रथमच महिला खेळाडूंचा ड्राफ्ट झाला आहे. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या काही नामांकित चेहऱ्यांना या ड्राफ्टमध्ये खरेदीदार मिळाला नाही. यामध्ये पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम, यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान, वेस्टइंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि ट्रेन्ट बोल्ट यांसारख्या बड्या खेळाडूंचा समावेश आहे. 

बाबरला खरेदी करण्यासाठी माझे सर्व पैसे देईन - ँडरसनबाबर आझमला खरेदीदार न मिळाल्याने इंग्लिश गोलंदाज ंडरसनने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीबीसीच्या पॉटकास्टमध्ये बोलताना ंडरसनने म्हटले, "मी बाबर आझमला खरेदी करण्यासाठी दुप्पट पैसे खर्च करेन. मी माझे सर्व बजेट बाबरला खरेदी करण्यासाठी खर्च करेन पण त्याला आपल्या ताफ्यात घेईनच. फक्त तो उपलब्ध नसू शकतो हिच एक समस्या असू शकते. कदाचित म्हणूनच त्याला कोणी खरेदी केले नसावे."

शाहीन आफ्रिदी वेल्स फायरच्या ताफ्यात बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारी घेतली आहे. त्यामुळे बाबर आझम एक मोठा सेलिब्रेटी बनत चालला आहे. त्याला द हंड्रेडमध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नसला तरी पाकिस्तानी संघाचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ हे द हंड्रेडमध्ये खेळताना दिसणार आहेत. शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदी वेल्स फायरकडून खेळणार आहे. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात लाहोर कलंदर्सच्या संघाने पाकिस्तान सुपर लीगचा सलग दुसऱ्यांदा किताब जिंकला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानइंग्लंडजेम्स अँडरसन
Open in App