क्रिकेटविश्वात तू रचलेले विक्रम आणि माइलस्टोन याबद्दल सगळे बोलतील... पण या सगळ्यात तू सर्वांपासून लपवलेले अश्रू, कोणीही न पाहिलेला संघर्ष आणि या खेळावर तुझे असलेले अढळ प्रेम हे सगळे मी पाहिले आहे. मला माहितीय या दरम्यान तू काय काय गमावलं आहेस.
एक दिवस तू व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार याची कल्पना होतीच. पण तू कायम तुझ्या मनाचे ऐकलंस आणि माय लव्ह, आज मला तुला हेच सांगायचेय की तुला मिळत असलेला हा भावुक निरोप यासाठी तू नक्कीच पात्र आहेस.
किंगची कसोटीतून निवृत्ती
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयानंतर सर्व क्रिकेटप्रेमी भावुक झाले आहेत. टेस्ट क्रिकेटमधील त्याचा १४ वर्षांचा प्रवास थांबला आहे.
प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू आणखी अनुभवी, आणखी थोडा नम्र होऊन परत आलास. या प्रवासात तुझी प्रगती होत असताना पाहणे हे माझे भाग्यच. - अनुष्का शर्मा
कसोटी कारकीर्द : २० जून २०११ : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण १२३ कसोटी सामने खेळला. ३१ अर्धशतके, ३० शतके, ७ द्विशतकांचा विक्रम.