Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता माझी सटकली... हसीनच्या वक्तव्यांवर यापुढे मी शांत बसणार नाही, मोहम्मद शामीचा उद्वेग

शामीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत, असे बेजबाबदार वक्तव्य हसीनने केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 19:15 IST

Open in App
ठळक मुद्देहसीनच्या वक्तव्यांवर यापुढे मी शांत बसणार नाही, असे उद्वेगजनक वक्तव्य शमीने केले आहे.

कोलकाता : पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांवर आतापर्यंत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी शांत होता. पण आता मात्र त्याचा संयम सुटला आहे. हसीनच्या वक्तव्यांवर यापुढे मी शांत बसणार नाही, असे उद्वेगजनक वक्तव्य शमीने केले आहे.

" अलिश्बा ही काही शामीची चाहती वैगेरे नक्कीच नाही. ती शामीची प्रेयसी आहे, जर लपून-छपून एक मुलगी पुरुषाला भेटत असेल तर हे प्रकरण फक्त ब्रेकफास्टपर्यंत थांबणार नाही, तर हे प्रकरण अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचलेले आहे. शामीने बऱ्याच मुलींच्या आयुष्याशी खेळ केला आहे. त्याने बऱ्याच मुलींना नासवले आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत, " असे बेजबाबदार वक्तव्य हसीनने आज केले होते. तिच्या या वक्तव्यावर शामी चांगलाच संतापला आहे.

कोलकाता पोलीसांनी आज शामीची चौकशी केली. या चौकशीमध्ये पोलीसांनीही शामीला हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. पण शामीने या गोष्टीला नकार दिला. याबाबत तो म्हणाला की, " हसीनचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. तिच्या आरोपांना काहीच अर्थ काही. पण आता तिचा स्तर घसरत चालला आहे. आतापर्यंत मी शांत होतो. पण यापुढे मी तिला तोडीस तोड उत्तर देईल. आता माझा संयम सुटला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण मिटवण्याचा विचार मी डोक्यातून काढून टाकला आहे. "

टॅग्स :मोहम्मद शामी