Join us  

निवड न झाल्यामुळे निराश होतो, पण रोहितसोबतच्या चर्चेनंतर समाधान

रोहितसोबतच्या चर्चेनंतर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 2:06 AM

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि स्थानिक स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी केल्यानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यामुळे सूर्यकुमार यादव निराश झाला होता, पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चा केल्यानंतर खेळल्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत मिळाली, असे सूर्यकुमार म्हणाला. सूर्यकुमार म्हणाला,‘संघाची घोषणा झाली त्यावेळी रोहित माझ्या बाजूला होता. त्याने माझ्याकडे बघितले मी म्हटले नक्कीच मी निराश आहे. कारण मी गोड बातमीची प्रतीक्षा करीत असल्याचे त्याला समजत होते.’त्यानंतर रोहित म्हणाला, तू सध्या संघासाठी शानदार काम करीत आहेत. संघात निवड न झाल्याचा विचार करण्यापेक्षा आयपीएलमध्ये पहिल्या दिवसापासून जे करीत आहेस ते करत राहा. योग्य वेळ येईल त्यावेळी तुला नक्की संधी मिळेल. हे आज ना उद्या होईल, केवळ स्वत:वरचा विश्वास कायम ठेवावा लागेल.‘

आयपीएलपूर्वी स्थानिक मोसमातही सूर्यकुमार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे, पण त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाही. सूर्यकुमार म्हणाला,‘रोहितच्या त्या शब्दांमुळे मला दिलासा मिळाला. मला त्याच्या शब्दांमुळे चांगले वाटत होते.’मुंबईच्या या ३० वर्षीय फलंदाजाने सांगितले की ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवडीवर लक्ष होते. स्पर्धेदरम्यान थोडा निराश होतो. मला कल्पना होती की आज संघाची निवड होणार आहे. मी स्वत:ला व्यस्त ठे‌वण्याचा प्रयत्न करीत होतो. डोक्यात निवडीबाबत विचार येणार नाही याची दक्षता घेत होतो. ‘संघात नाव नसल्याचे बघितल्यानंतर सूर्यकुमार निराश झाला. मुंबई इंडियन्सला आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावून देण्यास सूर्यकुमारची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.  

मी रुममध्ये बसून माझे नाव का नाही, याचा विचार करीत होतो. पण संघ बघितल्यानंतर त्यात बरेच खेळाडू भारतीय संघातर्फे व आयपीएलमध्ये धावा काढणारे होते. ‘स्पर्धा ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी जास्त धावा काढण्यापेक्षा संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणे अधिक महत्त्वाचे आहे.’

टॅग्स :आयपीएलरोहित शर्मामुंबई इंडियन्स