Join us

'मला नॉन-स्ट्राइकलाही अनुष्का हवी'; विराट कोहलीची सोशल मीडियावर खिल्ली

परदेश दौऱ्यावर पत्नीना सोबत घेऊन जाण्याची भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मागणी बीसीसीआयने अखेरीस मान्य केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 12:19 IST

Open in App

मुंबई : परदेश दौऱ्यावर पत्नीना सोबत घेऊन जाण्याची भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मागणी बीसीसीआयने अखेरीस मान्य केली. खेळाडूंना दोन आठवडेच आपल्या पत्नींना परदेश दौऱ्यावर घेऊन जाता येत होते. त्यावर विराट कोहलीने तीव्र नाराजी प्रकट केली होती. त्याने संपूर्ण मालिकेत पत्नींना सोबत नेण्याची विनंती केली होती. विराटच्या या हट्टासमोर बीसीसीआय पुन्हा झुकल्याचे उघड झाले आहे. आता परदेश दौऱ्यातील पहिल्या दहा दिवसांनंतर संपूर्ण मालिकेत खेळाडूंना आपापल्या पत्नींसोबत राहता येणार आहे. 

विराट कोहलीच्या या हट्टासमोर पुन्हा बीसीसीआय झुकल्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी प्रकट केली जात आहे. अनेकांनी विराटची खिल्लीही उडवली...

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय