Join us
Daily Top 2Weekly Top 5

हो...पाकिस्तानच्या अलिश्बाला मी दुबईमध्ये भेटलो होतो : मोहम्मद शामीचा खुलासा

आपण अलिश्बाला दुबईमध्ये भेटलो होतो, हे मान्य करतानाच हसीनने आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 16:21 IST

Open in App
ठळक मुद्देशुकवारी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मात्र मी अलिश्बाला भेटलो होतो, असा खुलासा दस्तुरखुद्द शामीने केला आहे.

कोलकाता : मोहम्मद शामी हा दुबईमध्ये पाकिस्तानच्या अलिश्बा नावाच्या मुलीला भेटला होता. या दोघांनी एकाच रुममध्ये काही काळ व्यतित केला होता. त्याचबरोबर अलिश्बाकडून शामीने काही पैसे घेतले आणि त्याने देशाची फसवणूक केली आहे, असा आरोप त्याची पत्नी हसीन जहाँने केला होता. याबद्दल शामीने आतापर्यंत कोणतेच वक्तव्य केले नव्हते. पण शुकवारी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मात्र मी अलिश्बाला भेटलो होतो, असा खुलासा दस्तुरखुद्द शामीने केला आहे.

शामी हा अलिश्बाबरोबर दक्षिण आफ्रिकेमध्ये एकत्र होता. हे दोघेही तिथून एकाच विमानातून दुबई गेले. दुबईला गेल्यावर या दोघांनी एका हॉटेलमध्ये अकच रुम घेतली होती आणि या दोघांनी काही काळ एकत्र व्यतित केला होता, असे हसीनने म्हटले होते. याविषयावर शामीने आतापर्यंत काहीही म्हटले नव्हते. पण आता मात्र शामीने आपण अलिश्बाला भेटलो होतो, असे स्पष्ट केले आहे.

याबाबत शामी म्हणाला की, " मी अलिश्बाला दुबईमध्ये माझ्या बहिणीच्या घरी भेटलो होतो. अलिश्बा ही माझी एक क्रिकेटपटू म्हणून चाहती आहे. ती मला इंस्टाग्रामवर फॉलोही करते. त्यामुळे ती मला फक्त एक चाहती म्हणूनच भेटली होती. त्यावेळी अलिश्बाबरोबर अजून एक माझा चाहताही होता. पण कोणत्याही चाहत्याला भेटणे यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही. "

आपण अलिश्बाला दुबईमध्ये भेटलो होतो, हे मान्य करतानाच हसीनने आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले आहे. मी आणि अलिश्बा कुठल्याही हॉटेलमध्ये भेटलो नव्हतो आणि तिच्याकडून मी कोणतेही पैसे घेतले नाही, असा खुलासाही शामीने यावेळी केला आहे.

टॅग्स :मोहम्मद शामी