मुंबई - बंगळुरूचा फिरकी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने स्पष्ट केले की, तो बाउन्सर टाकण्याची कोणतीही पूर्वतयारी करत नाही. त्याऐवजी, फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी तो आपल्या नैसर्गिक अंत:प्रेरणेचा वापर करतो.
रविवारी मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात कृणालने ४ षटकांत केवळ २६ धावा देऊन १ बळी घेतला. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना कृणाल म्हणाला, ‘मी वेगळ्या आणि नवीन गोष्टी करून पाहण्यास कधीही कचरलो नाही. इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू होण्यापूर्वी सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू असायचे आणि फलंदाजीची पद्धत खूप वेगळी होती; पण आता थेट आठव्या क्रमांकावरही तज्ज्ञ फलंदाज खेळायला येत आहेत.’ युवा फलंदाजांच्या आक्रमकतेवर तो म्हणाला, ‘युवा खेळाडू पहिल्या चेंडूपासूनच सातत्याने चांगले फटके मारत आहेत. पण मानसिकदृष्ट्या मला त्यांच्या एक पाऊल पुढे राहायचे आहे.’
बाउन्सरसाठी कोणतीही खास रणनीती नाहीबाउन्सरबद्दल बोलताना कृणालने स्पष्ट केले की, तो यासाठी कोणतीही विशेष तयारी करत नाही. ‘मी मनाचे ऐकतो. चौथा, पाचवा की सहावा चेंडू बाउन्सर टाकायचा, हे मी आधीच ठरवत नाही. कधी कधी मी सलग दोन बाउन्सर टाकतो, तर अचानक पहिला आणि सहावा चेंडूही बाउन्सर टाकतो. लोक माझ्या बाउन्सरबद्दल आणि चेंडूबद्दल खूप बोलतात जे दिसायला खूप वेगळे वाटतात; पण मी नेहमीच माझ्या गोलंदाजीच्या मूळ गोष्टींवर भर दिला आहे.’
Web Summary : Krunal Pandya reveals he doesn't pre-plan bouncers, relying on instinct to outsmart batsmen. He adapts to aggressive young players, mentally staying ahead. Pandya focuses on core bowling, varying bouncer frequency based on feel, not strategy.
Web Summary : कृणाल पांड्या का खुलासा: बाउंसर की पूर्व योजना नहीं बनाते, बल्लेबाजों को मात देने के लिए अंतर्ज्ञान पर निर्भर। आक्रामक युवा खिलाड़ियों के अनुकूल, मानसिक रूप से आगे रहते हैं। पांड्या रणनीति नहीं, बल्कि एहसास के आधार पर बाउंसर की आवृत्ति बदलते हैं।