पाकिस्तानचा युवा फलंदाज हसन नवाज याने भारतीय गोलंदाजांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्याने थेट "मला भारतीय गोलंदाजांचा तिरस्कार वाटतो," असे विधान केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खेळाडूंनी मैदानाबाहेर बोलताना संयम आणि खिलाडूवृत्ती पाळणे आवश्यक असते, मात्र हसनच्या या उद्धट विधानामुळे त्याच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.
पाकिस्तान सुपर लीग २०२६ च्या हंगामादरम्यान एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हसन नवाजला त्याच्या भविष्यातील ध्येयाबद्दल विचारण्यात आले. तसेच कोणत्या गोलंदाजांविरुद्ध धावा काढायला आवडेल? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने आपली मर्यादा ओलांडली. तो म्हणाला की, "जेव्हा भारतीय संघाचा विचार येतो, तेव्हा आम्ही नेहमीच त्यांच्या गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्याचे ध्येय ठेवतो. खरे सांगायचे तर, मला त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाचा तिरस्कार वाटतो. भविष्यात संधी मिळाली तर मी नक्कीच त्यांच्याविरुद्ध जोरदार कामगिरी करून दाखवेन."
हसन नवाजने २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून पदार्पण केले. त्याने २५ टी-२० सामन्यांत २०.७७ च्या सरासरीने ४५७ धावा. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या पीएसएलच्या हंगामात हसनला आपली चमक दाखवता आलेली नाही. १० सामन्यांमध्ये त्याने केवळ २९१ धावा केल्या असून यात फक्त दोन अर्धशतके आहेत. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय गोलंदाजाला आव्हान देणारा या गोलंदाजाने भारताविरुद्ध एकमेव सामना खेळला. या सामन्यात भारतीय गोलंदाजाने त्याव अवघ्या ५ धावांवर माघारी धाडले होते.
Web Summary : Pakistani cricketer Hasan Nawaz sparked controversy by stating he dislikes Indian bowlers and aims to perform well against them if given the chance. He made these comments during the PSL 2026 season. Nawaz has played one match against India, scoring only 5 runs.
Web Summary : पाकिस्तानी क्रिकेटर हसन नवाज ने यह कहकर विवाद खड़ा कर दिया कि उन्हें भारतीय गेंदबाज पसंद नहीं हैं और अगर मौका मिला तो वह उनके खिलाफ अच्छा प्रदर्शन करना चाहते हैं। उन्होंने ये टिप्पणियाँ पीएसएल 2026 सीज़न के दौरान कीं। नवाज ने भारत के खिलाफ एक मैच खेला है, जिसमें उन्होंने केवल 5 रन बनाए।