भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. आपल्या व्हिडीओतून तो नेटिझन्सना सामाजिक संदेश देतो. पण, गुरुवारी त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर लिहिलं की, मला हार्ट अटॅकच आला होता.... हा व्हिडीओ पाहून कोणत्याही पालकाचाय काळजाचा ठोका चुकेल. 
इरफाननं शेअर केलेल्या व्हिडीओत त्याचा मुलगा इमरान सायकल चालवायला शिकत आहे. सायकल चालवताना अचानक एका वळणावार इमरान पडला आणि ते मुलाला पडलेलं पाहून इरफानच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानं लिहिलं की, प्रत्येक आई-वडिलांना मिनी हार्ट अटॅक आणणारा हा क्षण आहे.''
 
 याआधी त्यानं  भाऊ युसूफ पठाणसह एक मजेशीर व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओवर सध्या खूप चर्चा रंगली होती. खुद्द युसूफ पठाणने आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. रमजान महिन्यात कडक नियमांचे पालन केले जाते. कडक उपवास केले जातात. इरफानने सुद्धा रोजा ठेवला आहे. यावरच एक मजेशीर व्हिडीओ इरफानने बनवला आहे. रोजामध्ये चुकून पाणी प्यायल्यास घरचे लगेच कसे रिएक्ट होतात यावर हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये युसूफ पठाण इरफानच्या पाठी बसलेला दिसतोय. इरफानला तहान लागते आणि सवयीप्रमाणे तो पाण्याची बाटली पिण्यासाठी उचलतो. पाणी प्यायला सुरुवात करताच युसुफ पठाण इरफानला भाई तेरा... रोजा है असं म्हणत रोजाची आठवण करू देतो. हे ऐकताच इरफान मजेशीर रिएक्शन देतो. 
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 
Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!
 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ
हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना
Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...