Join us

किरॉन पोलार्डमुळे माझी रवानगी जेलमध्ये होणार असंच मला वाटलं, हार्दिक पांडयाने केला खुलासा

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांडया फक्त भारतीय ड्रेसिंगरुममध्येच लोकप्रिय नाहीय त्याचे अन्य देशातील क्रिकेटपटूंसोबतही जिव्हाळयाचे संबंध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 14:34 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघ वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौ-यावर असताना मी माझा जास्त वेळ  पोलार्डसोबत घालवला. या दौ-याची आठवण सांगताना हार्दिकने पोलार्डने त्याच्यासोबत केलेला खोडकरपणाचा एक किस्सा सांगितला.

नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांडया फक्त भारतीय ड्रेसिंगरुममध्येच लोकप्रिय नाहीय त्याचे अन्य देशातील क्रिकेटपटूंसोबतही जिव्हाळयाचे संबंध आहेत. हार्दिकच्या खास मित्रांमध्ये वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डचा समावेश होतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळताना त्यांच्यातील मैत्रीचं नात अधिक घट्ट झालं. हार्दिक नेहमीच पोलार्डचा दुस-या आईच्या पोटी जन्मलेला माझा भाऊ असा उल्लेख करतो. त्यावरुन त्यांच्यातील दृढ नात्याची कल्पना येते. 

भारतीय संघ वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौ-यावर असताना मी माझा जास्त वेळ  पोलार्डसोबत घालवला. पोलार्डसोबत फिरताना तो मला काहीही होऊ देणार नाही असा विश्वास मला होता. या दौ-याची आठवण सांगताना हार्दिकने पोलार्डने त्याच्यासोबत केलेला खोडकरपणाचा एक किस्सा सांगितला. ज्यामुळे हार्दिक काहीवेळासाठी टेन्शनमध्ये आला होता. आता आपल्याला अटक होणारच असे त्याला वाटले होते.  ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात हार्दिकने हा किस्सा सांगितला. 

पोलार्डने एकदा पोलीसवाल्याला बोलावले तो पोलीसवाला मला अटक करण्याचा प्रयत्न करत होता. खरतर तो पोलीसवाला पोलार्डचा मित्र होता. ते दोघे मिळून मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. एक क्षण परिस्थिती गंभीर झाली होती. माझ्याबरोबर अशी मस्ती चालू असताना मी शांत उभा होतो. भारतीय संघाला इथे बोलवून या प्रकरणातून सुटका करुन घ्यावी असे मला एक क्षण वाटले होते. कारण माझी काहीही चूक नव्हती अखेर हा सर्व खोडकरपणाचा सुरु असल्याचे माझ्या लक्षात आले. 

टॅग्स :हार्दिक पांड्या