Join us  

IPL 2021: 'मुंबई इंडियन्स यंदा जिंकायला नकोच', सेहवागचं रोखठोक मत; कारणही सांगितलं

IPL 2021: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं आयपीएल संदर्भात आणि मुंबई इंडियन्सबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 8:53 PM

Open in App

IPL 2021: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं आयपीएल संदर्भात आणि मुंबई इंडियन्सबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. एका स्पोर्ट्स पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सेहवागनं यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये कोणते चार संघ असावेत याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगोलरसारखे संघ पोहोचायला हवेत. या संघांनी गुणतालिकेत आघाडीवर राहावं असं मनापासून वाटत असल्याचं सेहवागनं म्हटलं आहे. "मुंबई इंडियन्सनं यंदा अव्वल स्थानावर पोहोचावं असं मला वाटत नाही. कारण यंदा नवा संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरायला हवा आणि यंदाच्या सीझनच्या जेतेपदाचा मान नव्या संघाला मिळावा. मग तो बंगलोर, दिल्ली किंवा पंजाबचा संघ असायला हवा", असं वीरेंद्र सेहवागनं म्हटलं आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज संघानं अद्याप एकदाही आयपीएलचं जेतेपद पटकावलेलं नाही. हे तिनही संघ आजवर उत्तम खेळत आले आहेत. एखादं सीझन कुणासाठी खूप उत्तम राहिलं आहे. तर दुसऱ्या कुणासाठी तरी वाईट ठरलं आहे. यंदा दिल्ली आणि बंगलोरच्या संघानं खरंच वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांनी जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्न करावेत असं मनापासून वाटत असल्याचं सेहवागनं म्हटलं आहे. 

आयपीएलचा आजवरचा इतिहास पाहिला तर सध्याच्या परिस्थितीवर मात करुन मुंबई इंडियन्सचा संघ अंतिम फेरीतही पोहोचू शकतू इतकी त्या संघाची क्षमता आहे, असंही सेहवाग म्हणाला. "मुंबई इंडियन्सनं उर्वरित सामने जिंकले तर तेही १६ गुणांसह प्ले-ऑफमध्ये पोहोचतील आणि ते फायनमध्येही पोहचू शकतात. पण सध्याची परिस्थिती पाहता ते खूप कठीण आहे. कारण जेव्हा तुम्ही सर्व सामने जिंकण्यासाठी आसुसलेले असता तेव्हा तुमच्याकडून एक-दोन चुका होतातच आणि त्याच महागात पडतात", असं सेहवाग म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२१विरेंद्र सेहवागमुंबई इंडियन्स
Open in App