"मी टीकेला घाबरत नाही"; अर्जुन तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाला- "गोव्यात माझ्या घरी..."

Arjun Tendulkar on criticism: अर्जुनने एका मुलाखतीत आपल्या टीकाकारांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:14 IST2026-04-01T11:12:51+5:302026-04-01T11:14:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
I dont fear criticism said arjun tendulkar no-nonsense reply goes viral WATCH video | "मी टीकेला घाबरत नाही"; अर्जुन तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाला- "गोव्यात माझ्या घरी..."

"मी टीकेला घाबरत नाही"; अर्जुन तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाला- "गोव्यात माझ्या घरी..."

Arjun Tendulkar on criticism: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. मार्चच्या सुरुवातीला त्याच्या आयुष्यात नवीन टप्पा आला. त्याचे सानिया चांडोकशी लग्न झाले. त्यानंतर लगेचच तो IPLच्या तयारीला लागला. गेले दोन-तीन वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर या हंगामात तो लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळणार आहे. तत्पूर्वी, अर्जुनने एका मुलाखतीत आपल्या टीकाकारांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

टीकेवर काय म्हणाला?

मुलाखतकार शुभंकर मिश्रा यांनी अर्जुन तेंडुलकरला विचारले, "तुला टीकेची भीती वाटते का?" तेव्हा अर्जुनने स्पष्टपणे उत्तर दिले. तो म्हणाला, "नाही... मी टीके, ला घाबरत नाही. मी टीका करणाऱ्यांकडे लक्षच देत नाही." त्यानंतर त्याला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. शुभंकर मिश्रा यांनी पुढे विचारले, "तू मैदानात इतका शांत कसा राहतोस?" या प्रश्नावर अर्जुनने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, "मी गोव्यात असतो तिथे मी पाळीव कुत्र्यांशी खेळतो. माझ्याकडे ५ पाळीव कुत्रे आहेत आणि मी त्यांच्यासोबत वेळ घालवतो, त्यामुळेच मला शांत राहायला मदत होते."

अर्जुनचे मित्र कोण?

अर्जुन तेंडुलकरला शुभंकर मिश्रा यांनी विचारले की, तुझे मित्र कोण आहेत? त्यांच्याशी तू कुठल्या विषयावर गप्पा मारतोस? या प्रश्नावरही अर्जुनने खरेखुरे उत्तर दिले. तो म्हणाला, "माझे काही निवडक मित्र आहेत. विशेष म्हणजे, माझे फारसे मित्र क्रिकेट खेळणारे नाहीत. बहुतेक मित्र हे इतर क्षेत्रातील आहेत. त्यांना क्रिकेटबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे आम्ही एकत्र गप्पा मारताना क्रिकेटबद्दल बोलत नाही.

IPL मध्ये अर्जुन तेंडुलकरची नवी इनिंग

अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र, आयपीएल २०२६च्या लिलावात त्याला लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. त्यामुळे आता तो ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे. अर्जुनच्या निवडीवरून सध्या क्रिकेट वर्तुळात दोन गट पडले आहेत. रवीचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले होते की, लखनौकडे मोहम्मद शमी, मयंक यादव आणि मोहसीन खान यांसारखे दिग्गज गोलंदाज असल्याने अर्जुनला खेळण्याची संधी मिळणे कठीण आहे. यावर युवराज सिंगचे वडील योगराज सिंह यांनी संताप व्यक्त करत अश्विनवर टीका केली होती आणि अर्जुनला पाठिंबा दिला होता.

Web Title: I dont fear criticism said arjun tendulkar no-nonsense reply goes viral WATCH video