चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) निराशाजनक कामगिरीवर सर्वच नाराज आहेत. IPL 2020मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या सामन्यात CSKला ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. तीन वेळा IPL जेतेपद पटकावणाऱ्या CSKचा हा सात सामन्यांतील पाचवा पराभव आहे. त्यामुळे IPLच्या इतिहासात प्रथमच त्यांच्यावर प्ले ऑफच्या शर्यतीतून माघारी जाण्याची नामुष्की ओढावली आहे. CSKच्या या निराशाजनक कामगिरीवर इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन ( Kevin Pietersen) याने अंबाती रायुडूला खडे बोल सुनावले आहेत.  
कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्धचा सामना चेन्नईनं हातचा गमावला होता. त्यानंतर RCBच्या १७० धावांचा पाठलाग करताना CSKला ८ बाद १३२ धावाच करता आल्या. CSKच्या एकाही फलंदाजानं आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्नही केला नाही. या सामन्यात अंबाती रायुडूच्या रनिंग बिटविन विकेट्सवर पीटरसननं नाराजी प्रकट केली. चौथ्या षटकात तो फलंदाजीला आला आणि १८व्या षटकात माघारी परतला, परंतु त्याला ४० चेंडूंत केवळ ४२ धावा करता आल्या.  
सामन्याच्या ८व्या षटकांत रायुडूनं दोन धावा करण्याचा प्रयत्नही केला नाही. एन जगदीसन यानं एक धाव पूर्ण करून दुसऱ्यासाठी तो पुढे आला होता, पण तो पर्यंत रायुडूनं एक धाव पूर्ण केली होती. तो धाप टाकताना दिसत होता. त्यावरून पीटरसन भडकला. तो म्हणाला,''अंबाती रायुडूनं आतातरी जागं व्हायला हवं. तू जगातील सर्वोत्तम खेळाडूंना पाहिले आहेस, त्यांची रनिंग बिटविन दी विकेट पाहिले आहेत. जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करता, तेव्हा तू कोण आहेस, याची मला पर्वा नाही. तू सर्वोत्तम खेळ करायलाच हवा आणि रनिंग बिटविन दी विकेट चांगली ठेवायला हवी.''  
2010 च्या स्पर्धेत सीएसकेने साखळीचे 14 पैकी सात सामने जिंकले व सात गमावले होते आणि त्यांच्यापेक्षा अधिक विजय मुंबई इंडियन्स (10) व डेक्कन चार्जर्सच्या (8) नावावर होते पण शेवटी विजेतेपदाच्या ट्रॉफी चेन्नईनेच मुंबईला 22 धावांनी नमवून उंचावली होती. त्यामुळे धोनी आणि कंपनीला अजूनही संधी आहे असेच म्हणता येईल. 
यंदाचे पहिले सात सामने
1) वि. मुंबई इंडियन्स - विजय
2) वि. राजस्थान रॉयल्स - पराभव
3) वि. दिल्ली - पराभव
4) वि. सनरायजर्स - पराभव
5) वि. पंजाब- विजय
6) वि. केकेआर - पराभव
7) वि. रॉयल चॅलेंजर्स- पराभव