नवी दिल्ली: गौतम गंभीरचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय साहसी होता. त्याला पद सोडण्यास कुणी भाग पाडले नव्हते. इतकेच नव्हे तर पुढच्या सामन्यात त्याला मी वगळले नाही, तो स्वत: संघाबाहेर बसल्याने त्याच्याबद्दल माझ्या मनातील आदर आणखी वाढला, अशी भावना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर याने व्यक्त केली आहे.दिल्ली डेअरडेव्हिल्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. पण या संघामध्ये गौतम गंभीर नव्हता. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तडकाफडकी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर पुढच्याच सामन्यात गंभीर न खेळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामन्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला,‘ गंभीरने स्वत:हून संघाबाहेर बसून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याचा निर्णय घेतला. मी गंभीरला संघातून वगळले नव्हते. तो त्याचा स्वत:चा निर्णय होता. खरोखरच हा खूप मोठा निर्णय होता. त्याच्याबद्दल मनात असलेला आदर आता आणखी वाढला आहे. गंभीरच्या जागी कॉलिन मुन्रोला संधी देण्यात आली. . श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळणाºया दिल्ली डेअरडेव्हिल्सने कोलकाता नाईट रायडर्सला ५५ धावांनी नमवून पराभवाची मालिका संपवली. अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २२० धावांचे तगडे आव्हान कोलकातासमोर ठेवले होते.(वृत्तसंस्था)श्रेयस म्हणाला,‘ प्रामाणिकपणे सांगायचे तर मी गंभीरला वगळले नव्हते. गंभीर बाहेर बसावा असेही माझ्या मनात नव्हते. पण त्याने स्वत: बाहेर बसण्याचा निर्णय घेतला कारण तो मागच्या सामन्यात कर्णधार होता. एक कर्णधार चांगला खेळत नसेल तर स्वत:हून बाहेर बसण्याचा निर्णय घेतो हे पाहून बरे वाटले. गंभीरबद्दल माझ्या मनात असलेला आदर आणखीनच वाढला.’(वृत्तसंस्था)एका सामन्यात दहा षटकार ठोकणाराेश्रेयस पहिला कर्णधारश्रेयस अय्यर याने शुक्रवारी रात्री केकेआरविरुद्ध ९३ धावांची खेळी करीत स्वत:च्या शिरपेचात विक्रमाची नोंद केली. २३ वर्षांच्या श्रेयसने कर्णधारपदाचे दडपण बाजूला सारुन संघाला सुस्थितीत आणले. एका डावात दहा षटकार ठोकणारा आयपीएलमधील तो पहिला कर्णधार बनला. ही किमया विराट कोहली आणि महेंद्रसिंग दोधी यांना देखील अद्याप साधता आली नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- गौतमला मी वगळले नव्हते, तो स्वत: बाहेर बसला... - श्रेयस अय्यर
गौतमला मी वगळले नव्हते, तो स्वत: बाहेर बसला... - श्रेयस अय्यर
गौतम गंभीरचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय साहसी होता. त्याला पद सोडण्यास कुणी भाग पाडले नव्हते.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 05:54 IST