Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या साठीतही IPL मध्ये खेळशील? अभिनेत्याच्या प्रश्नावर MS धोनीचं उत्तर ऐकताच स्टेडियम दणाणलं!

MS धोनीच्या IPL निवृत्तीसंदर्भात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:11 IST

Open in App

आयपीएल २०२६ स्पर्धेच्या १९ व्या हंगामाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. यंदाचा हंगाम जिंकून चेन्नई सुपर किंग्सचा संघ जेतेपदाचा षटकार मारणार का? महेंद्रसिंह धोनीसाठी यंदाची स्पर्धा खास ठरणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून महेंद्र सिंह धोनी सातत्याने IPL च्या माध्यमातून क्रिकेटशी कनेक्ट आहे. नव्या हंगामाआधी धोनीनं IPL  निवृत्तीच्या मुद्यावर मजेशीर उत्तर दिले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

MS धोनीच्या IPL निवृत्तीसंदर्भात चर्चा IPL च्या १९ व्या हंगामाच्या आधी रविवारी (२२ मार्च) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने  ‘Roar26’ नावाचा फॅन इव्हेंट आयोजित केला होता. या कार्यक्रमात धोनी पुन्हा एकदा आपल्या खास विनोदी शैलीत बोलताना पाहायला मिळाले.

MS Dhoni: धोनीचं 'हे' शेवटचं वर्ष? बॅटिंग पोझिशन ठरणार चर्चेचा विषय, सीएसकेच्या रणनीतीत बदल होण्याची शक्यता

वयाच्या साठीपर्यंत IPL खेळणार धोनी?

अभिनेता शिवकार्तिकेयन याने रिटायरमेंटच्या चर्चांकडे दुर्लक्ष करून अजून बराच काळ खेळत राहा, असं म्हणाला यावर धोनी हसत म्हणाला की, “ते थोडं कठीण आहे.”  अभिनेता पुढे म्हणाला की, तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षीही खेळू शकता, तेव्हा धोनीने विनोदाने उत्तर दिलं “ठीक आहे… मी प्रयत्न करेन.” हे ऐकताच स्टेडियममधील हजारो चाहते आनंदाने जल्लोष करू लागले आणि “धोनी-धोनी”च्या घोषणा घुमू लागल्या. 

IPL मध्येही धोनीनं सोडली आहे खास छाप

धोनी IPL इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि खेळाडूच्या रुपात ओळखला जातो. सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये संयुक्तरित्या अव्वलस्थानी असलेल्या धोनीनं आतापर्यंच्या आपल्या कारकिर्दीत २७८ सामन्यांत ५४३९ धावा केल्या आहेत. बहुतेक वेळा तो मिडल ऑर्डर किंवा फिनिशरच्या रुपात खेळताना दिसला आहे .२०२६ च्या हंगाम खेळाडूच्या रुपात MS धोनीसाठी यंदाचा हंगाम कदाचित शेवटचा असू शकतो. पुढच्या हंगामापासून हा दिग्गज खेळाडू CSK सोबत एका वेगळ्या भूमिकेत दिसू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Will you play IPL at 60? Dhoni's reply stuns stadium!

Web Summary : Amid retirement rumors, MS Dhoni playfully responded to a fan's question about playing IPL at 60, saying he'd try, sparking cheers. He remains a pivotal figure for CSK, possibly transitioning to a different role soon.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग