Join us

Pakistan Cricket: "मी तसे अजिबात समजत नाही.."; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर इफ्तिखार अहमदचं खोचक उत्तर

Iftikhar Ahmed, Pakistan Cricket: पाकिस्तानच्या संघाची बांगलादेशने नुकतीच मोठी फजिती केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:19 IST

Open in App

Iftikhar Ahmed, Pakistan Cricket: पाकिस्तानच्या संघाची नुकतीच मोठी फजिती झाली. पाकिस्तानवरबांगलादेश विरूद्ध कसोटी मालिकेत पहिल्यांदा पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. यापूर्वी टी२० वर्ल्डकपमध्येही त्यांना फारशी उल्लेखनीय कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होताना दिसत आहे. याच संघातील टीकेचे लक्ष्य ठरणारा एक खेळाडू म्हणजे इफ्तिखार अहमद. त्याने एकूण ६६ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने पाचव्या ते सातव्या क्रमांकावर बॅटिंग केली आहे. केवळ एकदा त्याला आठव्या क्रमांकावर खेळावे लागले. वनडे सामन्यांतही पाचव्या ते सातव्या क्रमांकावरच खेळायला लावले गेले. याचसंदर्भात त्याला पत्रकाराने एक प्रश्न विचारला. त्यावर इफ्तिखारने चिडून कुत्सितपणे उत्तर दिले.

पाकिस्तानमधील एका पत्रकाराने त्याला 'मधल्या फळीतील फलंदाज' किंवा 'अष्टपैलू खेळाडू' म्हटले. त्यावर उपहासात्मक पद्धतीने उत्तर देत तो म्हणाला, "मी मधल्या फळीचा फलंदाज नाही. मी तसे अजिबात समजत नाही. मी तर खालच्या फळीतील फलंदाज आहे. मी अष्टपैलू खेळाडू नाही, मी शेवटच्या फळीतला खेळाडू आहे. मी सातव्या-आठव्या क्रमांकावर खेळतो म्हणून तुम्ही मला ऑलराऊंडर किंवा मधल्या फळीतील खेळाडू म्हणत असाल तर ते योग्य नाही. इतर संघातील मधल्या फळीचे खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू चौथ्या ते सहाव्या क्रमांकावर अससताना खेळतात. मी तर सातव्या-आठव्या नंबरवर खेळतो. त्यामुळे मी टेल-एंडर म्हणजे खालच्या फळीतील फलंदाज आहे," असा टोला इफ्तिखारने लगावला.

इफ्तिखार अहमद गेल्या काही सामन्यांत सातत्याने अयशस्वी होतोय. त्याला मोठी खेळी खेळता येत नाही. टी२० वर्ल्डकप मध्ये त्याला आपली छाप पाडण्याची खूप चांगली संधी होती. भारताविरूद्धचा सामना जिंकवून देण्याची त्याच्याकडे संधी होती. पण त्याला ते जमले नाही. अतिशय मोक्याच्या क्षणी त्याने बेजबाबदार खेळ केला. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेशपत्रकार