MS Dhoni Villain In His Family : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची क्रेझ आजही कायम असल्याचे दिसून येते. झिरो ते टीम इंडियाचा हिरो हा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. त्यामुळेच अन्य क्रिकेटर्सच्या तुलनेत धोनी आणखी भारी ठरतो. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याची हिरोगिरी पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीनं घरातल्या गोष्टी शेअर करताना स्वत:बद्दल मनात निर्माण होणारी भावनाही बोलून दाखवल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीकडून लेक जिवाच कौतुक, म्हणाला...
आयपीएलआधी महेंद्रसिंह धोनीनं एका पॉडकास्ट कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंदर्भातील गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्याने लेक जिवा (Ziva) चं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. ती १० वर्षांची झालीये, असे सांगताना धोनीनं आपल्या लेकीच्या शिक्षणाच्या गोडी बद्दलची गोष्ट शेअर केली. जिवा कधीही शाळा चुकवत नाही. वेळेवर अभ्यास करते. आपली सर्व कामे ती एकदम व्यवस्थितीत आणि पूर्ण प्लॉनिंगसह करायला तिला आवडते, असेही धोनीनं सांगितले.
साक्षी अन् जिवा यांच्यातील बॉन्डिंग अन् धोनीला 'खलनायक' ठरवणारी गोष्ट
यावेळी धोनी पुढे म्हणाला की, जिवा आणि साक्षी यांच्यात खूप चांगले बॉन्डिंग आहे. माझी घरी परतण्याची वेळ झाली की, जिवाच्या अवतीभोवती असणारे घरातील अन्य लोक आणि आजी तिला पप्पा येत आहेत, पप्पा घरी येण्याची वेळ झालीये असे सांगतात. यावेळी माझ्याच घरात मी खलनायक होतो, असे तो गंमतीने म्हणाला आहे. धोनीची लेक जिवा ही सोशल मीडियावरील लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. तिचे स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाउंट असून आताच तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा ३ मिलियनच्या घरात आहे.
Web Title: I Am Like Villain In The Family MS Dhoni Share Intresting Things Of Daughter Ziva And Wife Sakshi Dhoni Watch Viral Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.