शतकाविना शंभर लढती; विराटच्या नावे नकोसा विक्रम...

आयपीएलमध्ये यंदा ७ सामन्यांत त्याच्या केवळ ११९ धावा झाल्या. ४८ ही सर्वोच्च खेळी ठरली. आयपीएलच्या २१४ सामन्यांत सर्वाधिक ६४०२ धावा ठोकण्याचा मानदेखील विराटलाच आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:26 AM2022-04-22T10:26:03+5:302022-04-22T10:27:34+5:30

whatsapp join usJoin us
Hundred Matches without a century; record in the name of Virat kohli | शतकाविना शंभर लढती; विराटच्या नावे नकोसा विक्रम...

शतकाविना शंभर लढती; विराटच्या नावे नकोसा विक्रम...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडिया आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदला गेला. गेल्या शंभर सामन्यांत त्याने शतक ठोकलेले नाही. विराटने १७ कसोटी, २१ वन डे, २५ टी-२० आणि ३७ आयपीएल सामन्यांत शतकी खेळी केलेली नाही.
-  विराटने अखेरचे वन डे शतक १४ ऑगस्ट २०१९ ला क्वीन्स पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध, तर कसोटी शतक २२ नोव्हेंबर २०१९ ला ईडन गार्डनवर बांगला देशविरुद्ध साजरे केले.
-  आयपीएलमध्ये यंदा ७ सामन्यांत त्याच्या केवळ ११९ धावा झाल्या. ४८ ही सर्वोच्च खेळी ठरली. आयपीएलच्या २१४ सामन्यांत सर्वाधिक ६४०२ धावा ठोकण्याचा मानदेखील विराटलाच आहे. 

-  आंतरराष्ट्रीय सामन्यात २३,६५० धावांसह सर्वाधिक धावा काढण्यात विराट ७ व्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकर ३४,३५७ धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे.

Web Title: Hundred Matches without a century; record in the name of Virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.