Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडच्या खेळाडूवर ओढावला लज्जास्पद क्षण; मायकेल वॉन म्हणतो, आनंद झाला की...!

The Hundred : इंग्लंडचा फलंदाज रवी बोपारा ( Ravi Bopara) याच्यावर दी हंड्रेड लीगमध्ये शनिवारी लाजीरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 20:54 IST

Open in App

The Hundred : इंग्लंडचा फलंदाज रवी बोपारा ( Ravi Bopara) याच्यावर दी हंड्रेड लीगमध्ये शनिवारी लाजीरवाण्या प्रसंगाचा  सामना करावा लागला. लंडन स्पीरिट संघाला थोडक्यात ओव्हल इनव्हिसिबल्स संघाकडून हार मानावी लागली. लंडन स्पीरिट संघाच्या ७ बाद १४६ धावांचा ओव्हल इनव्हिसिबल्स संघानं २ विकेट्स व ५ चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला. लंडन स्पीरिटनं प्रतिस्प्रधी संघाचे ३ फलंदाज १७ चेंडूंत १४ धावांवर माघारी पाठवले होते. पण, विल जॅक्स व लौरी इव्हान्स यांनी दमदार खेळ केला. 

विराट कोहलीनं जेम्स अँडरसनला दिली शिवी, स्टुअर्ट ब्रॉडनं सडेतोड उत्तर दिले!

या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना रवी बोपारानं चेंडू अडवण्यासाठी डाईव्ह मारली आणि त्याची पँट जवळपास पुर्णपणे निघालीच होती. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूची अंडरवेअर दिसायला लागली अन् BCC साठी समालोचन करणाऱ्या मायकेन वॉनला हसू आवरले नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला, ते खूपच वाईट होऊ शकले असते. मला आनंद आहे,  की  तू लगेच पँट वर घेतलीस.   २००७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॉनलाही अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला होता.  

टॅग्स :इंग्लंडसोशल व्हायरल
Open in App