The Hundred : इंग्लंडचा फलंदाज रवी बोपारा ( Ravi Bopara) याच्यावर दी हंड्रेड लीगमध्ये शनिवारी लाजीरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला. लंडन स्पीरिट संघाला थोडक्यात ओव्हल इनव्हिसिबल्स संघाकडून हार मानावी लागली. लंडन स्पीरिट संघाच्या ७ बाद १४६ धावांचा ओव्हल इनव्हिसिबल्स संघानं २ विकेट्स व ५ चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला. लंडन स्पीरिटनं प्रतिस्प्रधी संघाचे ३ फलंदाज १७ चेंडूंत १४ धावांवर माघारी पाठवले होते. पण, विल जॅक्स व लौरी इव्हान्स यांनी दमदार खेळ केला.
या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना रवी बोपारानं चेंडू अडवण्यासाठी डाईव्ह मारली आणि त्याची पँट जवळपास पुर्णपणे निघालीच होती. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूची अंडरवेअर दिसायला लागली अन् BCC साठी समालोचन करणाऱ्या मायकेन वॉनला हसू आवरले नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला, ते खूपच वाईट होऊ शकले असते. मला आनंद आहे, की तू लगेच पँट वर घेतलीस.
२००७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॉनलाही अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला होता.