पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव; दक्षिण आफ्रिकेचे निर्भेळ यश

आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 15:41 IST2019-01-14T15:40:17+5:302019-01-14T15:41:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
The humiliating defeat of Pakistan | पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव; दक्षिण आफ्रिकेचे निर्भेळ यश

पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव; दक्षिण आफ्रिकेचे निर्भेळ यश

जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : पाहुण्या पाकिस्तान संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकही कसोटी जिंकण्यात अपयश आले. तिसऱ्या कसोटीत 381 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ 273 धावांवर माघारी परतला. या सामन्यात आफ्रिकेने 107 धावांनी विजय संपादन केला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. 



पाकिस्तान संघाने 3 बाद 153 धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात केली. मात्र, त्यांचे फलंदाज झटपट माघारी परतले. ड्युआने ऑलिव्हरने पाकिस्तानच्या बाबर आझम आणि कर्णधार सर्फराज अहमद यांना माघारी पाठवून आफ्रिकेचा विजय पक्का केला. ऑलिव्हरच्या धक्कातंत्रानंतर कागिसो रबाडाने पाकिस्तानला हादरे दिले.



 


दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 303 धावा करत पाकिस्तानपुढे 381 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून असद शफिकने 65 धावांची खेळी साकारत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण फिलँडरने त्याला बाद केले आणि पाकिस्तानचा संघ पराभवासमीप येऊन पोहोचला. 

Web Title: The humiliating defeat of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.