Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : आरसीबीला मोठा धक्का! 'या' मॅच विनर खेळाडूचा रिप्लेसमेंट शोधण्याची वेळ

हेजलवूडसह पॅट कमिन्सही सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:27 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या हंगामाला सुरुवात होण्याआधी गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातील स्टार गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) अजून पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामन्यात संघाला त्याच्याशिवायच मैदानात उतरावे लागणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमने IPL मध्ये सहभागी होण्यासाठी फिट असल्याची पुष्टी केल्याशिवाय तो मैदानात उतरु शकत नाही. सध्या तो पुनर्वसन प्रक्रियेत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB vs SRH यांच्यात रंगणार आहे यंदाच्या हंगामातील सलामीची लढत

आयपीएलच्या १९ व्या हंगामातील उद्घाटनाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यासह पहिल्या टप्प्यातील आणखी काही सामन्याला जोश हजलवूड मुकणार असल्याची गोष्ट समोर आली आहे. त्याची उणीव भरून काढण्याचे मोठे चॅलेंज RCB संघासमोर असेल. दुसऱ्या बाजूला सनरायझर्सच्या संघाला पॅट कमिन्सशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.

"पहला ही उड़ा देंगे…" संजूनं शेअर केला वैभव अन् कोच द्रविड यांच्यातील खास संवादाचा किस्सा (VIDEO)

हेजलवूडसह पॅट कमिन्सही सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

ऑस्ट्रेलियातील क्रीडा पत्रकार डॅनियल चेर्नी (Daniel Cherny) यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि जोश हेजलवूड (Josh Hazlewood) हे दोघेही सध्या दुखापतीनंतर पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) प्रक्रियेत असल्याचे सांगत IPL च्या पहिल्या टप्प्यात ते खेळताना दिसणार नाहीत, ही माहिती दिली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या जेकब डफी याला RCB च्या ताफ्याकडून संधी मिळू शकते. 

दुखापतीमुळे या मोठ्या स्पर्धला मुकला हेजलवूड हेजलवुडला नोव्हेंबरमध्ये न्यू साउथ वेल्स कडून खेळताना उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पर्थ येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस कसोटीला मुकला. या दुखापतीतून सावरत असताना टाचेला दुखाप झाली अन् तो संपूर्ण स्पर्धातून बाहेर पडला. तो ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकला होता. किमान महत्त्वाच्या सामन्यात तरी  तो RCB च्या ताफ्यात परतणार का? ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: RCB setback! Key bowler's replacement needed due to injury.

Web Summary : RCB faces a blow as Josh Hazlewood is unfit for initial IPL 2026 matches. His replacement is crucial for RCB. Pat Cummins will also miss early games, creating challenges for both teams. Jacob Duffy might get a chance.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग