Join us

म्हणून कांगारुंच्या गोंधळानंतरही पंचांनी हार्दिक पांड्याला दिले नाबाद

इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यातील 48 व्या षटकांत पांड्याचा झेल आणि त्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावबादची अपील केल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 23:06 IST

Open in App

कोलकाता, दि. 21 - इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यातील 48 व्या षटकांत पांड्याचा झेल आणि त्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावबादची अपील केल्याचे पाहायला मिळाले. पांड्याला नो बॉलमुळे झेल बाद दिले नाही हे सर्वांना मान्य असेल. मात्र क्रिकेटच्या नियमावलीत नो बॉलवर फलंदाज धावबाद ठरतो. त्यामुळे पंचानी ऑस्ट्रेलियन संघावर अन्याय केला का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. मात्र पंचानी ऑस्ट्रेलियावर संघावर कोणताही अन्याय केलेला नाही. कारण क्रिकेटच्या नियमावलीनुसारच पंचानी हार्दिक पांड्याला नाबाद दिले.रिचर्ड्सनच्या या षटकांतील चौथ्या चेंडू पांड्यानं हवेत मारला. स्मिथने हा झेल सहज टिपला. हा चेंडू नो बॉल असू शकतो हे लक्षात येताच स्मिथनं पांड्याला धावबाद करण्याची धडपड केली. मात्र त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू डेड झालेला नसल्याचे सांगत धावबादसाठी दाद मागताना दिसले. पण पंचानी हे अपील फेटाळून लावले.क्रिकेटच्या नियमावलीतील 27.7 नुसार जर गैरसमजातून फलंदाज मैदान सोडत असेल तर पंच हस्तक्षेप करून फलंदाजाला थांबवू शकतात. शिवाय हा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात. याच नियमाच्या आधारावर पंचानं हार्दिक पांड्याला नाबाद ठरवले. त्यानंतर पावसाने खेळामध्ये व्यत्यय आणला. त्यानंतर साधारण 15 मिनिटांनी खेळाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर भारतानं निर्धारित 50 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या.