Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...

भारताच्या टेनिसपटूच्या प्रतिक्रियेनंतर चर्चा थांबली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 12:57 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी शोएब मलिक भेटणार सानिया मिर्झालापाच महिन्यांपासून सानिया-शोएब यांची भेट झालेली नाही

कोरोना व्हायरसमुळे सध्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू सोशल मीडियावरून आपापल्या फॅन्ससोबत आणि मित्रांसोबत चॅट करत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि त्याची पत्नी सानिया मिर्झा एकमेकांपासून दूर आहेत. तेही सोशल मीडियावरून एकमेकांशी संवाद साधत आहेत. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात मलिका पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्याशी फ्लर्ट करताना दिसत आहे.

शोएब मलिका आणि माहिरा खान यांनी नुकताच इंस्टाग्रामवरून एकमेकांशी संवाद साधला. त्यात या दोघांचा मैत्रीपूर्ण संवाद सुरू होता आणि त्यात सानियाचाही विषय निघाला. इंस्टाचॅट दरम्यान माहिरानं आपण दोघंही म्हातारे झालोत असे म्हटले. त्यावर मलिक म्हणाला, कदाचित मी म्हातारा होईल, परंतु माहिरा नाही. त्याच्या या कमेंटवर माहिरानं पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची फिरकी घेतली. ती म्हणाली, की आपलं हे इस्टा लाईव्ह 'भाभी' ( सानिया मिर्झा) पाहतेय.  

मलिक म्हणाला, ती माझी भाभी नाही. त्यावर माहिराला हसू आवरलं नाही. ती म्हणाला,''मला तसं म्हणायचं नव्हतं. ती संपूर्ण पाकिस्तानची भाभी आहे.'' सानिया मिर्झाला रहावलं नाही आणि तिनंही या चॅटमध्ये सहभाग घेतला. ''तुम्ही दोघं काय म्हणताय, यावर माझं लक्ष आहे,''असे सानिया म्हणाली.   

पाहा व्हिडीओ...

मलिक आणि सानिया पाच महिन्यांपासून एकमेकांना भेटलेले नाहीत.  मलिक पाकिस्तानात त्याच्या आईसोबत आहे, तर सानिया मिर्झा हैदराबाद येथे तिच्या आई-वडिलांसह आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) मलिकला त्याच्या पत्नी व मुलीला भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोघांची लवकरच भेट होईल, अशी अपेक्षा आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!

पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह

अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

 

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झा