Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली किती शिकलाय माहित्येय?... वाचून चकित व्हाल!

आक्रमक स्वभावाच्या विराट कोहलीचे शिक्षण तुम्हाला माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 20:29 IST

Open in App

मुंबई - भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेट विश्वात नव्या उंचीवर आहे. प्रत्यक सामन्यागणीक नवनवे विक्रम करत असतो.  त्याचा चाहतावर्ग भारतात आणि भारताबाहेरही तेवढाच आहे. आक्रमक स्वभावाच्या विराट कोहलीचे शिक्षण तुम्हाला माहित आहे का? त्याचे शिक्षण वाचून तुम्हाला धक्काच बसेल. पण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तुम्हाला तुमचं शिक्षण काय हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. परंतु काही क्षेत्र अशी असतात जिथे काही लोकांनी शिक्षणापेक्षा आपल्या कर्तृत्वाने ते क्षेत्र गाजवले आहे. त्यात नेहमी सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले जाते. परंतु भारतीय संघातील अन्य खेळाडूंच्या शिक्षणाबद्दल तेवढी चर्चा होत नाही.  भारतीय कर्णधार विराट कोहली फक्त 12वी पर्यंत शिकला आहे.  दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने 2008 साली मलेशियामधील 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. 

या खेळाडूंचे शिक्षण - 

धोनी - बी कॉम

हार्दिक पांड्या - 9 वी नापास

शिखर धवन -12वी

राहित शर्मा - 12 वी 

अजिंक्य रहाणे - 12 वी

उमेश यादव -  12 वी

टॅग्स :विराट कोहली