Join us

IND vs PAK : भारतीय संघाकडून कॉमेंटेटर्सनी गाजवलं मैदान! पाकचा युवा संघ ठरला फिका

Hong Kong Sixes 2025, IND vs PAK : भारताचे माजी क्रिकेटर अन् कॉमेंटटर्ससमोर फिका ठरला पाकिस्तानचा युवा जोश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:57 IST

Open in App

Hong Kong Sixes 2025, IND vs PAK : हाँगकाँग येथील मोंग कॉक परिसरातील मिशन रोड क्रिकेट ग्राउंडवर जगातील सर्वात छोट्या क्रिकेट प्रारुपात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ यांच्यात लढत झाली. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या सामन्यातील विजयासह Hong Kong Sixes 2025  स्पर्धेत विजयासह सुरुवात केली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यात हाँगकाँगमधील जगातील सर्वात छोट्या प्रारुपात दोन्ही संघातील सामन्यात एक खास वेगळेपण चर्चेता विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारताचे माजी क्रिकेटर अन् कॉमेंटटर्ससमोर फिका ठरला पाकिस्तानचा युवा जोश  

हाँगकाँगमधील यंदाच्या हंगामातील स्पर्धेत  १२ संघांचा समावेश आहे. भारतीय संघ दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला आहे. या संघात भरत चिपली,  रॉबिन उथप्पा, स्टुअर्ट बिन्नी,अभिमन्यू मिथुन, शाहबाज नदीम प्रियांक पांचाळ या खेळाडूंचा सहभाग आहे. दिनेश कार्तिकसह रॉबिन उथप्पा, स्टुअर्ड बिन्नी ही मंडळी समोलोचकाच्या रुपात दिसतात. याशिवाय अन्य मंडळी प्रशिक्षकाच्या रुपात काम करत आहेत. या संघाने पाकिस्तानच्या युवा खेळाडूंनी बहरलेल्या संघाला पराभूत करुन दाखवलं आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या भारतीय क्रिकेटर्ससमोर सक्रीय आणि पाकिस्तान क्रिकेटचं भविष्य असणाऱ्या क्रिकेटर फिके ठरल्याचे पाहायला मिळाले.

पाकच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा 

  • साद मसूद – २० वर्षे
  • माअज सदाकत – २० वर्षे
  • मोहम्मद शहजाद – २१ वर्षे
  • शाहिद अझीझ – २२ वर्षे
  • ख्वाजा नफाय – २३ वर्षे
  • अब्बास आफ्रिदी – २४ वर्षे
  • अब्दुल समद – २७ वर्षे

 

पाकिस्तान धावांचा पाठलाग करताना पावसाची बॅटिंग. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने २ धावांनी जिंकला सामना 

Hong Kong Sixes स्पर्धेत प्रत्येक संघात ६ खेळाडू असतात. ६ षटकांच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना उथप्पाने २ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ११  चेंडूत २८ धावा केल्या. त्याच्यासोबत डावाची सुरुवात करणाऱ्या विकेट किपर बॅटर चिपळीनं १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २४ धावा केल्या. स्टुअर्ड बिन्नी एक चौकार मारून परतल्यावर कर्णधार दिनेश कार्तिकनं  ६ चेंडूत काढलल्या १७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ६ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर ८६ धावा लावल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने ३ षटकांत एका विकेट्सच्या मोबदल्यात ४१ धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना इथंच थांबला. परिणामी  सामन्याचा निकाल हा डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. यात भारतीय संघाने २ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs PAK: Indian Commentators Shine, Pakistan's Young Team Fades!

Web Summary : In Hong Kong Sixes 2025, India defeated Pakistan. Veteran Indian cricketers turned commentators outshone Pakistan's young team. D/L method declared India winner by 2 runs after rain stopped play.
टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानदिनेश कार्तिक