Join us  

अफगाणिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचं हार्ट अटॅकनं निधन? जाणून घ्या व्हायरल सत्य

अफगाणिस्तान संघाचा यशस्वी अष्टपैलू खेळाडूच्या निधनाच्या वार्ता शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगल्या होत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 11:27 AM

Open in App

अफगाणिस्तान संघाचा यशस्वी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीच्या निधनाच्या वार्ता शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगल्या होत्या. नबीचा हार्ट अटॅकनं निधन झाल्याची चर्चा होती. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटवर मोठी शोककळा पसरले होते आणि चाहत्यांकडून खंत व्यक्त करण्यात येत होते. पण, ही अफवा असून मी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा खुलासा स्वतः नबीनं केला.  

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळानेही नबी राष्ट्रीय संघासोबत काबुल स्टेडियमवर सराव करत असल्याचा फोटो ट्विट करून या अफवांना पूर्णविराम लावला. त्या फोटोत नबीही दिसत आहे. तरीही अफवांचा पेव सुरूच होता.   ''मी ठिक आहे. सोशल मीडियावर फिरणारी निधनाची वार्ता ही अफवा आहे,'' असे नबीनं ट्वीट केलं.  अफगाणिस्ता संघातील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून नबी ओळखला जातो. त्यानं 121 वन डे सामन्यांत 2699 धावा केल्या आहेत आणि त्यात 14 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्यानं 128 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यानं 72 ट्वेंटी-20 सामन्यांत चार शतकं झळकावली आहेत आणि 69 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून  निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानं अखेरच्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर ऐतिहासिक विजय मिळवला.  

नबी जगातील विविध ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळतोय. पाकिस्तान सुपर लीग, बिग बॅश लीग, इंडियन प्रीमिअर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग, कॅरेबिनय प्रीमिअर लीगसह अफगाण लीगमध्येही तो विविध संघाचे प्रतिनिधित्व करतो.  

  

टॅग्स :अफगाणिस्तानसोशल व्हायरल