Join us  

मोठा पेच! हिटमॅन रोहित शर्मा फिट; तरीही टीम इंडियासोबत खेळू शकणार नाही

Rohit Sharma News: आयपीएलहून परतल्यानंतर रोहितला  हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करणे गरजेचे होते. आता बीसीसीआय रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवायचे की नाही याचा निर्णय घेणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 1:46 PM

Open in App

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)ने शुक्रवारी याची घोषणा केली. रोहितने फिटनेस चाचणी पास केल्यानंतर रोहितला खेळण्यासाठी फिट करार दिला आहे. 

आयपीएलहून परतल्यानंतर रोहितला  हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करणे गरजेचे होते. आता बीसीसीआय रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवायचे की नाही याचा निर्णय घेणार आहे. रोहित १९ नोव्हेंबरला एनसीएला गेला होता. रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दोघेही एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत होते. 

ऑस्ट्रेलियाला गेला तरी क्वारंटाईन?सूत्राने सांगितले, ‘जर ते प्रवास करणार असतील तर त्यांच्यासाठी विलगीकरणाचे नियम कडक असतील. कारण ते व्यावसायिक विमानाने प्रवास करतील. कठोर विलगीकरण म्हणजे त्यांना पूर्ण संघासोबत विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या कालावधीत सराव करण्याची परवानगी राहणार नाही.’आता केवळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच आपल्या सरकारची मनधरणी करीत त्यांना विलगीकरण कालावधीदरम्यान सरावाची परवानगी देऊ शकते. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रविवारी म्हटले होते की, ‘हे दोन्ही खेळाडू जर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाले तरच ते कसोटी मालिकेत खेळू शकतील.’

सचिननेही व्यक्त केली चिंता‘मला रोहितच्या फिटनेसबद्दल कल्पना नाही. हे बीसीसीआय आणि रोहितला माहीत आहे. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. बीसीसीआय, फिजिओ आणि व्यवस्थापन याचे उत्तर देईल.  रोहितने फिटनेस टेस्ट पूर्ण केली तर त्याच्यासारखा खेळाडू ऑस्ट्रेलियात असायला हवा, असे सचिन तेंडुलकर म्हणाला होता. 

टॅग्स :रोहित शर्माआॅस्ट्रेलियाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय