Join us
Daily Top 2Weekly Top 5

अफगाण संघासाठी ऐतिहासिक क्षण

अफगाणिस्तान संघ क्रिकेटच्या काही स्वरुपांमध्ये यापूर्वीच खेळलेला आहे, पण त्यांना आता कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आहे, याची कल्पना येईल. युवा आणि अनुभवी यातील फरक त्यांना कळायला लागेल. अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये प्रतिभा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 05:17 IST

Open in App

- सौरव गांगुली अफगाणिस्तान संघ क्रिकेटच्या काही स्वरुपांमध्ये यापूर्वीच खेळलेला आहे, पण त्यांना आता कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आहे, याची कल्पना येईल. युवा आणि अनुभवी यातील फरक त्यांना कळायला लागेल. अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये प्रतिभा आहे. राशिद खानतर आताच चर्चेचा विषय ठरला असून त्यांचे सर्वंच खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडण्यास उत्सुक असतील, असे मी ठामपणे सांगू शकतो. त्यांच्या देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम असलेल्या संघाविरुद्ध ते पदार्पणाची लढत खेळणार असल्यामुळे त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. यामुळे त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये आपण कुठल्या पातळीवर आहोत, हे कळण्यास मदत होईल.कोहलीविना खेळतानाही भारतीय संघ बलाढ्य आहे. या लढतीच्या निमित्ताने अफगाणच्या खेळाडूंना आपली छाप सोडण्याची संधी आहे. मी जर अफगाणिस्तानचा खेळाडू असतो तर मी याकडे एक संधी म्हणून बघितले असते. दडपण आणि संधी यामध्ये फार थोडा फरक आहे आणि अफगाणच्या खेळाडूंनी याकडे संधी म्हणून बघायला हवे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे, यात शंका नाही, पण अफगाण संघ खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहील, अशी अपेक्षा राहील. कारण फिरकी गोलंदाजी हे त्यांचे शक्तीस्थळ आहे.भारतीय संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटी संघाचे चांगले नेतृत्व केले होते. त्याच्यासाठी हा मोठा सामना आहे. इंग्लंड दौऱ्यात वन-डे संघात त्याला संधी मिळालेली नाही, त्याचे मला वाईट वाटते. दक्षिण आफ्रिका दौºयात पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वगळल्यानंतर तिसरा कसोटी सामना जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर भारतीय संघ खेळत असलेल्या कसोटी सामन्यात तो संघाचे नेतृत्व करीत आहे. ‘क्रिकेटपटू म्हणून माझे स्टेट्स काय आहे, असा विचार तो नक्की करीत असेल. पण, हे सर्व विचार बाजूला ठेवून त्याने धावा फटकावण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यामुळे सर्व प्रश्न निकाली निघतील. कसोटी क्रिकेटमध्ये तो शानदार आहे. खेळाडूंना कारकिर्दीमध्ये अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागतेच, हे त्याने लक्षात ठेवायला हवे. (गेमप्लॅन)

टॅग्स :क्रिकेटअफगाणिस्तान