Join us  

'हा ऐतिहासिक सामना भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचशकातील सामन्यासारखाच'

हा सामना मला भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचशकातील सामन्यासारखाच वाटतो, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 7:20 PM

Open in App

कोलकाता : इडन गार्डन्समध्ये भारतातील ऐतिहासिक क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. हा भारतातील पहिला दिवस रात्र सामना असणार आहे. हा सामना मला भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचशकातील सामन्यासारखाच वाटतो, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

ऐतिहासिक सामन्यापूर्वी कोहलीने एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये कोहलीला या सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कोहलीने आपले मत व्यक्त केले होते.

या सामन्याबाबत कोहली म्हणाला की, " यापूर्वी आम्ही इडन गार्डन्सवर विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचा सामना आम्ही खेळलो होता. त्या सामन्यासारखीच उत्सुकता मला या सामन्याविषयी वाटते आहे. या सामन्यात नेमके काय होईल, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. ही गोष्ट भारतामध्ये पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे जेव्हा ८० हजार लोकं तुम्हाला पाठिंबा देत असतील तर ते पाहणे खरंच उत्सुकतेचे असेल." 

भारतात उद्यापासून ऐतिहासिक सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ, कोलकातावासिय, बीसीसीआय सारेच सज्ज झाले आहेत. पण या सामन्यासाठी तुम्ही सज्ज आहात का, असा प्रश्न भारतीय संघातील खेळाडू विचचारत आहेत.

ऐतिहासिक सामन्याच्या काही तासांपूर्वी बीसीसीआयने एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताता कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी, इशातं शर्मा, उमेश यादव, वृद्धिमान साहा, कुलदीप यादवसारखे बरेच क्रिकेटपटू आहेत. या सर्व खेळाडूंनी चाहत्यांना या सामन्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे.

पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल विराट कोहलीने केला मोठा खुलासा, सांगितले का रद्द करावा लागला सामनामुंबई : भारतामध्ये पहिल्या डे नाइट टेस्ट सामना उद्यापासून सुरु होणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण पहिल्या पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. हा सामना रद्द का करावा लागला, याबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये उद्यापासून पहिल्या डे नाइट टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. पण यापूर्वीही भारताची एक डे नाइट टेस्ट मॅच होणार होती. पण या मॅचचे नेमके काय झाले, याबाबत कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

भारताचा संघ गेल्यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारताचा संघ कसोटी मालिकाही खेळणार होता. या कसोटी मालिकेत भारताने एक सामना डे नाइट खेळावा, अशी ऑस्ट्रेलियाने विनंती केली होती. पण भारताने ही विनंती मान्य केली नाही. भारताने डे नाइट टेस्ट खेळायला तेव्हा का नकार दिला, याबाबत कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे.

या बाबत कोहली म्हणाला की, " डे नाइट कसोटी खेळणे सोपे नसते. या सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरला जातो. या चेंडूचा तुम्हाला चांगला सराव असेल तरच तुम्ही डे नाइट टेस्ट खेळू शकता. ही गोष्ट पटकन स्वीकारण्यासारखी नक्कीच नाही. जर ही गोष्ट फार पूर्वी ठरली असती तर आम्ही विनंती स्वीकारून डे नाइट टेस्ट मॅच खेळलो असतो. पण ऐनवेळी या गोष्टी ठरवून होणार नाही." 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध बांगलादेश